एक्स्प्लोर

शिक्षक भरतीसाठी उमेदवारांचं आठव्या दिवशी उपोषण सुरुच

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुढील आठ दिवसांत पंधरा जिल्ह्यांमधील शिक्षक भरतीची पहिली जाहिरात काढली जाईल, असं तीन दिवसांपूर्वी जाहीर केलं आहे.

पुणे : पुण्यातील सेंट्रल बिल्डिंगसमोर शिक्षकभरती व्हावी यासाठी अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. यातील काही उमेदवारांची तब्येत बिघडली आहे. त्यांना ससून रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. मात्र उपचार करुन ही मुलं पुन्हा उपोषणाला बसली आहेत.

डॉक्टरांनी या मुलांची तब्येत खालावल्यानं फळं आणि ज्यूस पिण्याचा सल्ला दिला आहे. असं न केल्यास या मुलांची प्रकृती आणखी खालवू शकते, असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्वत: फोन करून या मुलांशी संवाद साधला.

मात्र विनोद तावडे यांच्या फोन नंतरही या उपोषणावर तोडगा निघू शकलेला नाही. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा पवित्रा या मुलांनी घेतला आहे. 24 हजार जागांची शिक्षक भरतीची जाहिरात एकाच टप्प्यात काढल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्यावर हे उमेदवार ठाम आहेत.

महाराष्ट्रभरातून इतर उमेदवारही येऊन या उपोषण करणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देत आहेत. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी मंगळवारी मुंबईला येऊन चर्चा करण्याची सूचना त्यांनी केली आहे. आंदोलनकर्त्यांचं एक शिष्टमंडळ मुंबईला जाणार आहे, मात्र मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

आठ दिवसांत शिक्षक भरतीची जाहिरात काढणार : विनोद तावडे

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुढील आठ दिवसांत पंधरा जिल्ह्यांमधील शिक्षक भरतीची पहिली जाहिरात काढली जाईल, असं तीन दिवसांपूर्वी जाहीर केलं आहे. "सरकारी शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी संस्थांची जाहिरात काढली जाणार आहे. जाहिरातीनंतरच्या पंधरा दिवसांत सर्व भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच या भरतीदरम्यान संस्थाचालक घेत असलेल्या प्रत्येक मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंगदेखील केले जाईल. आगामी निवडणुकांचा विचार करुन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ", असं विनोद तावडे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar: 'कोणाचीही गय केली जाणार नाही, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा'; राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश
'कोणाचीही गय केली जाणार नाही, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा'; राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश
Rana Suryavanshi Attack Baramati Crime: मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?
मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?
Baramati  : मुंबईत टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, तर बारामतीत एका उद्योजकावर हल्ला, धक्कादायक घटनांनी महाराष्ट्र हादरला
Baramati  : मुंबईत टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, तर बारामतीत एका उद्योजकावर हल्ला, धक्कादायक घटनांनी महाराष्ट्र हादरला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
Gokul Election Result: कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
JIO IPO : जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, 8110 कोटींसाठी अडीच लाख कोटींची बोली, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Embed widget