एक्स्प्लोर

जिगरबाज आबासाहेब सावंतांच्या पाठीवर गृहमत्र्यांची शाबासकीची थाप, कारवाईसाठी केलेला बोनेटवर जीवघेणा प्रवास

सावंतांनी लावलेली जीवाची बाजी आणि प्रत्यक्षदर्शींचे प्रसंगावधान यामुळे चालकाला बेड्या ठोकण्यात यश आले होते. याची दखल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली.

पिंपरी-चिंचवड: गृहमंत्री अनिल देशमुखांनी पिंपरी चिंचवडचे वाहतूक पोलीस आबासाहेब सावंतांच्या कार्याचे कौतुक केले. कर्तव्यावर असताना एका चालकाने सावंतांना ठोकर दिली, तेव्हा ते बोनेटवर पडले. अशा परिस्थितीत त्या चालकाने एक किलोमीटर अंतर सुसाट गाडी पळवली होती. सावंतांनी लावलेली जीवाची बाजी आणि प्रत्यक्षदर्शींचे प्रसंगावधान यामुळे चालकाला बेड्या ठोकण्यात यश आले होते. याचा थरार कॅमेऱ्यातून सर्वांसमोर आला. त्यानंतर आज गृहमंत्री देशमुखांनी सावंतांना मुंबई बोलवून त्यांचं कौतुक केलं. यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ही उपस्थित होते.

सायंकाळी चारच्या सुमारास अहिंसा चौकात वाहतूक पोलीस आबासाहेब सावंत आणि इतर कर्मचारी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत होते. तेव्हा चिंचवड स्टेशन चौकाकडून चाफेकर चौकाकडे 50 वर्षीय युवराज हणवते त्यांच्या चारचाकीतून निघाले होते. पण त्यांनी घातलेला मास्क हा नाक आणि तोंड सोडून गळ्याजवळ असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. म्हणून कारवाईसाठी त्यांना हात दाखवला असता हणवते पोबारा करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, त्यांच्या पुढे वाहतूक पोलीस आबासाहेब सावंत आले आणि त्यांनी गाडी रोखली. हणवतेंनी थोडावेळ थांबलोय, असं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा रेसवर पाय दिला असता सावंत यांच्या पायाला धक्का लागला.

तेव्हा सावंत यांचा बोनेटच्या दिशेने तोल गेला. ते बोनेट वरून खाली उतरणार तोवर हणवते यांनी गाडीचा वेग वाढवला. ही बाब काही उपस्थित दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांनी पाहिली. मग हणवतेच्या गाडीचा फिल्मी स्टाईल पाठलाग सुरू झाला. काही क्षणातच अहिंसा चौकातून हणवते चाफेकर चौकात पोहचले, मग हणवते यांनी गाडीचा वेग आणखीच वाढवला. गाडी चिंचवड पोलीस स्टेशनसमोर आली, तेव्हा दोन्ही बाजूंनी दोन दुचाकीस्वार, पुढे एक रिक्षा असं घेरण्यात आलं. पण चारचाकी सुसाट होती. सावंत जीव मुठीत घेऊन बोनेटला कसेबसे धरून बसले होते. काही केल्या हणवते थांबायचं नाव घेईना, शेवटी एक दुचाकीस्वाराने शक्कल लढवली आणि पुढे धावणारी मोठी चारचाकी गाडी रस्त्यात थांबवली. तेव्हा मात्र हणवतेसमोर पर्याय उरलाच नाही. गाडी थांबताच सावंतांसह सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मग हणवतेंकडे सर्वांनी मोर्चा वळवला, उपस्थितांनी गाडीला घेरलं आणि हणवतेना गाडीतून बाहेर येण्याची सूचना सुरू झाली.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on Delhi Protest: एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
Pune Crime News: घरी गेला; त्या गोष्टीवरून वाद अन् तरूणानं आजीला संपवलं, घटनेनंतर पोलीस ठाण्यात गेला, घटनेनं पोलिसही चक्रावले
घरी गेला; त्या गोष्टीवरून वाद अन् तरूणानं आजीला संपवलं, घटनेनंतर पोलीस ठाण्यात गेला, घटनेनं पोलिसही चक्रावले

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on Delhi Protest: एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...
Donald Trump : सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले... तुमचा निर्णय कधीच विसरणार नाही म्हणत थेट इशारा दिला
सलग दुसऱ्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराची हुलकावणी, डोनाल्ड ट्रम्प नॉर्वेवर भडकले...
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली

Embed widget