एक्स्प्लोर
वाहतूक कोंडीमुळे खालापूर टोलनाक्याजवळ सर्व वाहनांना विनाटोल प्रवास

पुणेः कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खालापूर टोलनाक्याजवळ मोठी कोंडी झाली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. रांगा पिवळ्या रेशेच्या मागे गेल्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनाही विनाटोल सोडलं जात आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्यांना अगोदरच टोलमध्ये सूट देण्यात आली आहे. मात्र वाहतुकीची कोंडी वाढत चालल्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनाही टोलमध्ये सूट देण्यात आली आहे. वीकेंड आणि सलगच्या सुट्ट्यांमुळे ही कोंडी झाली आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्यांना टोलमध्ये सूट मिळण्यासाठी पास दिला जात आहे. मात्र या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
Before You Go
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story





















