Gurunath Naik Passes Away: बाराशे मराठी कादंबऱ्या लिहिणारे प्रख्यात रहस्यकथाकार व गोमंतकीय लेखक गुरुनाथ नाईक यांचे आज निधन झाले. नाईक गेल्या काही महिन्यांपासून गंभीर आजाराने ग्रस्त होते. मात्र, त्यांनी आज वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. नाईक यांच्या कादंबर्‍यांना बाजारात चांगली मागणी होती. कॅप्टन दीप, मेजर भोसले ही त्यांची पात्रे रहस्यकथा वाचणार्‍या वाचकांच्या मनात घर करून बसली आहेत. 


गुरुनाथ नाईक हे मूळचे गोव्याचे होते. त्यांनी लोंढ्यात प्राथमिक शिक्षण घेऊन उच्चशिक्षणासाठी बेळगाव गाठले. गुरुनाथ यांनी रहस्यकथा लिहण्यापूर्वी 1975 ते 1963 च्या काळात विविध विषयांवर लिखाण केले. याच काळात त्यांनी अनेक मराठी मसिकांतून हेमचंद्र साखळकर आणि नाईक या नावांनी लिखाण केले. एवढेच नव्हेतर, त्यांनी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी काही संगीतिका, तर गोवा केंद्रासाठी काही श्रुतिका त्यांनी लिहिल्या.


नाईक हे लातूर येथे बरीच वर्ष दैनिक एकमतचे संपादक होते. याशिवाय, त्यांनी पुणे तरूण भारत, पुणे सकाळ, मनमाडमध्ये दैनिक गावकरी, औरंगाबादेत दैनिक अजिंठा, गोव्यात दैनिक गोमंतक, नवप्रभा अशा विविध दैनिकांत कामे केली. महत्वाचे म्हणजे, त्यांनी कांदबऱ्यांसाठी 1970 मध्ये नोकरी सोडली आणि स्वत:ची शिलेदार प्रकाशन संस्था सुरू केली.


रहस्यकथा थांबवल्यानंतर त्यांचे लिखाण अधिक प्रगल्भ होत गेले. चालू घडामोडींची कल्पनेशी सांगड घालून अनेक कथा लिहल्या. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्य लोकांसमोर मांडण्यासाठी त्यांनी 500 पानांची कांदबरी लिहली. यानंतर त्यांनी संभाजी महाराजांच्या जीवनावरही 'नरकेसरी' ही कादंबरी लिहली. याचबरोबर एलओसीवरील ‘धगधगती सीमा’ तर, ओसामा बीन लादेनवरील ‘इस्लामी ड्रॅगन’अशाही  कांदबरी लिहली. त्यांनी लिहलेल्या रहस्य कादंबऱ्याद्वारे एका मोठ्या चाहत्या वर्गाला खिळवून ठेवले. 


 संबंधित बातम्या-