मुंबई : दिवाळीच्या काळात देशामध्ये अनेक ठिकाणी जरी फटाक्यांवर बंदी आणली जात असली तरी त्याची अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी येत आहेत. मुंबईचा विचार करता  50 टक्के फटाक्यांच्या उत्सर्जनाच्या परिस्थितीसह, सध्याची हवामानाची परिस्थिती हवेच्या गुणवत्तेला अत्यंत खराब श्रेणीत आणण्यास मदत करेल. त्यामुळे 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक अत्यंत खराब राहण्याची शक्यता आहे असा अंदाज आयआयटीएमच्या ‘सफर’ ने व्यक्त केला आहे. 


पीएम 10 आणि पीएम 2.5 ची सर्वोच्च पातळी 5 नोव्हेंबर रोजी पहाटे सकाळी 1 ते सकाळी 4 पर्यंत अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईतील माझगाव, बीकेसी-चौक आणि मालाड ही ठिकाणं सर्वाधिक प्रदूषित क्षेत्र असणार आहेत. 


गेल्या एका आठवड्यापासून, मुंबईत तुलनेने थंड वातावरण, सोबतच वारे जमीनीकडून समुद्राच्या दिशेनं वाहत आहे. त्यामुळे वातावरण प्रदूषित होण्यास अनुकूल असे वातावरण निर्माण झाले आहे. आजचा एअर क्वालिटी इन्डेक्स देखील वाईट आहे. त्यामुळे धाप लागणे, थकवा जाणवण्यासारख्या गोष्टी नागरिकांना जाणवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. आज माझगाव आणि बीकेसीतील एअर क्वालिटी इन्डेक्स अत्यंत खराब असून पीएम 2.5 चा स्तर हा 300 च्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांना  श्वास  घेण्यास त्रास जाणवणार आहे. 


काय आहे पीएम 10 आणि पीएम 2.5? 


पीएम 10 -
पीएम 10 म्हणजे पर्टिक्युलेट मॅटर (Particulate Matter) होय. याच्या कणाचा आकार हा 10 मायक्रोमीटर व्यास इतका सुक्ष्म असतो. यामध्ये धुळीचे कण किंवा धातूचे सुक्ष्म कणांचा समावेश असतो. रस्त्यावरील धूळ किंवा बांधकाम सुरु असताना हवेत मिसळणारी धूळ तसेच कचऱ्यामधून याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो. 


पीए 2.5 -
पीएम 2.5 म्हणजे पर्टिक्युलेट मॅटर ज्याचा आकारमान 2.5 मायक्रोमीटर व्यास इतका सुक्ष्म असतो. पीएम 10 सोबत तुलना करता पीएम 2.5 हे अधिक धोकादायक असतं. आकारमान लहान असल्याने ते सहजरित्या आपल्या फुफ्फुसांमध्ये प्रवेश करतात. 


सर्वसाधारणपणे पीएम 10 चा सामान्य स्तर हा मायक्रो ग्रॅम क्युबिक मीटर इतका असावा लागतो. तर पीएम 2.5 चा सामान्य स्तर हा 60 मायक्रो ग्रॅम क्युबिक मीटर इतका असावा लागतो. पीएम 10 आणि पीएम 2.5 च्या वाढत्या प्रमाणामुळे डोळे जळजळणे, फुफ्फुसांचा आजार आणि गळ्यामध्ये खवखवणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात. 


महत्वाच्या बातम्या :