1. पहिल्या डोसच्या बाबतीत 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के लसीकरण करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना, तर कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांसंदर्भात पंतप्रधानांनी बोलावली बैठक


जी 20 शिखर परिषद आणि हवामान बदल परिषद  26(COP26) मध्ये सहभागी होऊन देशात परतल्यानंतर लगेचच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कमी लसीकरण  (Covid Vaccine) झालेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. कोरोना (Coronavirus) प्रतिबंधक लसीचा पहिला डोस 50% पेक्षा कमी दिलेल्या आणि  दुसऱ्या डोसची व्याप्ती अत्यंत कमी असलेल्या जिल्ह्यांचा या बैठकीत समावेश असेल. झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय आणि अन्य राज्यातील कमी लसीकरण व्याप्ती असलेल्या 48 जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. यावेळी या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.


2. लस घेतली नाही, आणि घेणारही नाही, इगतपुरीतल्या किर्तन सोहळ्यात प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांचं वक्तव्य


3. कोल्हापुरातल्या वेगवेगळ्या कंपन्यांवर धाड टाकत जवळपास हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त, ऐन दिवाळीत अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई


4. कोणत्याही संपत्तीवर टाच नाही, आयकरनं कारवाई केल्याच्या वृत्तावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, आयकरच्या पत्राला कायदेशीर उत्तर देणार असल्याचा इशारा


5. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगातच जाणार, सहा नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी, घरचं जेवण देण्यास कोर्टाची परवानगी


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 03 नोव्हेंबर 2021 : बुधवार : ABP Majha



6. धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर देशभरात 9 हजार 200 कोटींची सोनं विक्री, ग्राहकांच्या प्रतिसादामुळं व्यापाऱ्यांना लॉकडाऊनच्या गर्तेतून बाहेर काढण्यास मोठा हातभार


7. राज्यात कोरोना प्रादुर्भावात घट, मंगळवारी 1078 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 48 जणांचा मृत्यू


8. इन्स्टाग्राम स्टार 'फैजू'ची भरधाव कार थेट सोसायटीत, अपघातानंतर फैजूला अटक, Instaवर अडीच कोटी फॉलोअर्स


9. नीरज चोप्रा, मिताली राजसह 12 जणांचा खेलरत्न पुरस्कारानं गौरव; तर शिखर धवनला अर्जुन पुरस्कार


2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याच्यासह एकूण 12 जणांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकून देणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह याचाही खेलरत्न पुरस्कारात समावेश करण्यात आला आहे. खेलरत्न पुरस्कारासाठी 11 जणांची नामंकने होती. मनप्रीत सिंह याचं नाव समाविष्ट करण्यात आल्यामुळे एकूण 12 जणांना खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. शिखऱ धवन, संदीप नरवाल आणि भवानीदेवी यांच्यासह 35 जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.  तर 10 जणांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येणार आहे.  13 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवनमध्ये सर्वांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमुळे यंदा या पुरस्कारांची उशीरा घोषणा झाली आहे. यंदाच्या क्रीडा पुरस्कारांमध्ये ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं नाव उंचावणाऱ्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. 


10. पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर टीम इंडियाची आज अफगाणिस्तानशी लढत, संघात बदल होण्याची शक्यता