Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Pune News LIVE Updates : पुणे आणि परिसरातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
पुण्यात गेल्या 24 तासात 98 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 69 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 494732 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 03 कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 687 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 5269 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.
Pune Coronavirus Vaccination : पुण्यात तीन दिवस लसीकरण बंद राहणार आहे. पुण्यातील सरकारी रुग्णालयामध्ये गुरुवार, शनिवार आणि रविवारी लसीकरण होणार नाही. शुक्रवारी केवळ सकाळच्या सत्रात लसीकरण करण्यात येणार आहे. दिवाळीमध्ये लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. लशीचा पहिला डोस 18 वर्षांवरील 100 टक्के पुणेकरांनी घेतला आहे. आता नागरिकांनी दुसरा डोस घ्यावा यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
पुणे शहराची ओळख विद्येच माहेर घर आणि सांस्कृतिक शहर म्हणून पुणे शहराची एक ओळख आहे. ही ओळख शहरातील सर्वांनी जपली आहे.मात्र त्याच दरम्यान दिवाळी सणाच्या निमित्ताने मागील काही वर्षापासून पुणे शहराचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्रीकांत शिरोळे यांच्या पुढाकारमधून वाडेश्वर कट्ट्यावर शहरातील सर्व पक्षीय नेते मंडळी एकत्रित दिवाळीचा फराळ घेत,मनमोकळ्या गप्पा मारतात. फराळ च्या सोबतीला इडली सांबर, वडा सांबर आणि चहा अस असते. यंदा देखील अशाच कार्यक्रमाच आयोजन केले असून यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप,सभागृह नेते गणेश बिडकर,मनसेचे गटनेते वसंत मोरे,भाजपचे नेते संदीप खर्डेकर,माजी उपमहापौर डॉ.सतीश देसाई हे सहभागी झाले आहेत.
पार्श्वभूमी
भोर वेल्हा परिसरात बिबट्याचा वावर, रस्त्यावर बिबटे फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल
सध्या भोर वेल्हा परिसरात बिबट्यांचे दर्शन अनेक वेळा होत आहे. .काल रात्री बिबट्याचे संपूर्ण कुटुंब
कुसगाव खिंडीमध्ये फिरताना दिसले. त्याचा व्हिडीओ वांगणी गावातील लोकांनी काढला आहे त्यात स्पष्टपणे तीन बिबटे रस्त्यावर फिरत असल्याचे दिसत आहेत. तर चौथा बिबट्या रोडच्या कडेला असलेल्या झाडीत होता. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. वनविभागाकडून गस्त आणि उपाययोजना राबवण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. बिबट्या दिसल्यास त्वरित वनविभागाची संपर्क साधा, असे आव्हान करण्यात आले आहे.
विद्युत रोषणाईने उजळून निघाला किल्ले सिंहगड!
पुण्यातील सिंहगडाला अनेक पर्यटक भेट देत असतात. दिवाळीनिमित्त सिंहगडावर नुकतीच खास रंगीबेरंगी विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. गड किल्ले संवर्धन संस्थेच्या वतीने ही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
लोहगाव विमानतळ पुन्हा सुरू; प्रवाशांची गर्दी वाढली
लोहगाव विमानतळ दुरुस्तीच्या कामासाठी मागील पंधरा दिवस बंद होतं. नंतर ते 31 तारखेपासून पुन्हा सुरू करण्यात आले. त्यामुळे आता विमानतळावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. दिवाळीचेनिमित्त साधून बाहेर जाण्यासाठी आणि पुण्यात येण्यासाठी प्रवाशांची विमानतळावर मोठी गर्दी होत आहे.
पुण्यातील द पूना मर्चंट चेंबर्स यांचे 'मेघा किचन'; 33 वर्षापासून ना नफा ना तोटा तत्वावर फराळ
पुण्यातील द पूना मर्चंट चेंबर्सकडून गेल्या 33 वर्षापासून ना नफा ना तोटा तत्वावर फराळ तयार केला जातो. तसंच पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एक मेघा किचन तयार करण्यात आलंय. याठिकाणी एक लाख किलो लाडू आणि एक लाख किलो चिवडा तयार केला जात आहे.
सावरकरांना सोडवण्यासाठी गांधींनी प्रयत्न केले: शरद पोंक्षे
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाबाराव सावरकर अंदमानात असताना त्यांचे धाकटे बंधू नारायण सावरकर त्यावेळी इथे होते. त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे होते. नारायण सावरकर यांनी गांधींना विचारलं दोन्ही बंधू अडकलेत त्यांना सोडवण्यासाठी तुम्ही काही करु शकता का? त्यावर गांधीजी म्हणाले, तुम्ही तुमच्या मार्गाने प्रयत्न करा, मी माझ्या मार्गाने करतो. गांधींनी सावरकरांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले, याचे पुरावेही आहेत. काँग्रेसवाल्यांना हे माहितीही नसेल की, सावरकांना सोडवायला गांधींनी प्रयत्न केलेत. अभ्यास नसल्याने काहीही बोलतात, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -