एक्स्प्लोर

सत्ताधाऱ्यांकडूनच सीबीआय वेठीला : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसने आज पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच इथे संविधान बचाओ रॅलीचं आयोजन केलं. या रॅलीत अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते सहभागी झाले होते.

पुणे : ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी आता सत्तेचा गैरवापर करण्यास सुरुवात केली आहे. देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेला वेठीस धरलं जात आहे. हे चित्र देशाच्या दृष्टीने घातक आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच लोकांचे प्रश्न न सोडवणाऱ्या सरकारकडून आम्ही लोकशाही मार्गाने सत्ता हिसकावून घेऊ, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसने आज पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच इथे संविधान बचाओ रॅलीचं आयोजन केलं. या रॅलीत अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते सहभागी झाले होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांमधून संविधानाचे महत्त्व सादर केलं. त्यानंतर या नेत्यांकडून मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं. सीबीआय वाद सध्या देशभरात गाजत असलेल्या सीबीआय वादावर शरद पवार म्हणाले की, "सीबीआयमध्ये जे काही झालं, अधिकाऱ्यांच्या ज्या पद्धतीने बदल्या झाल्या, नियुक्त्या झाल्या यावरुन सरकारचा प्रशासनाला हाच इशारा दिला की आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा." शबरीमला मंदिर प्रवेश वाद "शबरीमला मंदिरात 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यात यावा," असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मात्र "ज्याची अंमलबजावणीच होऊ शकत नाही, असा निर्णय न्यायालय कसा देऊ शकतं," असा प्रश्न भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी उपस्थित केला होता. याविषयी शरद पवार म्हणाले की, "सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना केरळ सरकारनेही कोर्टाचा आदर करायचं ठरवलं. मात्र भाजपचे अध्यक्ष तिथे गेले आणि विरोधात बोलले. यावरुन त्यांना न्यायालय, संविधान, स्त्री-पुरुष समानता मान्य नाही हेच दिसतं." ...तरीही सरकार निर्णय घ्यायला तयार नाही राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवरही शरद पवारांनी सरकारने हल्लाबोल केला. "दुष्काळाच्या झळा सर्वांनाच बसत आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र आहे. पण सगळ्यात जास्त त्रास महिलांना होत आहे. शेकडो भगिनी पाण्यासाठी कष्ट करतात आहेत. मात्र सरकार निर्णय घेण्यास तयार नाही‌. आघाडी सरकार असताना दुष्काळात चारा छावण्या सुरु केल्या. मात्र आताच सरकार म्हणतंय की आम्ही चारा तयार करु आणि तो घरोघर पोहोचवू," असं पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Embed widget