Pune Godowns Fire: पुण्यातील कोंढवा येथील लागलेल्या आगीवर (Fire) जवळपास चार तासानंतर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.  पुण्यातील कोंढवा परिसरात असणाऱ्या एका कमर्शियल कंपाउंडला आज सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती. या तीन एकरच्या कंपाऊंडमध्ये सुमारे 25 विविध वस्तूंचे गोडाऊन होते आणि त्यापैकी 22 गोडाऊन आगीच्या भक्षस्थानी गेलेले यावेळी पाहायला मिळाले. सुदैवाने या आगीच्या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळतंय. 


सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही


तब्बल चार तास 22 अग्निशामन दलाच्या गाड्यांनी आणि शंभरपेक्षा अधिक अग्निशमन दलाच्या जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. कोंढवा परिसरात गंगाधाम सोसायटी जवळील कंपाऊंडला ही आग लागली होती. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडे आठच्या सुमारास आगीमुळे धूर पसरण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर काहीच वेळात या आगीने रौद्ररुप धारण केले. लोकांची वस्ती असल्यामुळे प्रशासनाने तात्काळ कंपाऊंड जवळील इमारती रिकाम्या करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर तात्काळ या इमारती रिकाम्या करण्यात आल्या.  ही आग नेमकी कशामुळे लागली तसेच या आगीचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे.  


रहिवाशी भाग असल्याने येथे लोकांनी गर्दी करण्यास देखील सुरुवात झाली. परंतु अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवणे. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं देखील सांगण्यात येत आहे. 






काही दिवसांपूर्वी देखील लागली होती आग


काही दिवसांपूर्वी पुण्यातील  एका कारखान्याला आग लागली होती. या आगीमध्ये एका मजुराचा मृत्यू झाला होता, तर पाच जण भाजले गेले होते. पुण्यातील ब्लू जेट हेल्थकेअर नावाच्या कंपनीत आग लागली होती. ही कंपनीमध्ये एक्स-रे आणि एमआरआयमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू तयार करतात. कंपनीतील नायट्रिक अॅसिडच्या टँकरजवळ ही आग लागली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांनी दीड तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले. पंरतु पुण्यात होणाऱ्या या सततच्या आगीच्या सत्रामुळे पुणेकरांमध्ये आता भितीचे वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Pune News : अकोल्यातील धाडीत सहभागी अधिकाऱ्यांना तातडीने पुण्यात पाचारण, कृषी आयुक्तांकडून धाडीचा आढावा