Pune News : अकोल्यात कृषी विभागाच्या पथकाकडून टाकण्यात आलेला छापा चांगलाच वादग्रस्त ठरला. हा छापा टाकणार्‍या पथकातील 40 हून अधिक अधिकाऱ्यांना आज पुण्यात कृषी संचालकांनी पाचारण केलं आहे. छाप्यात सहभागी असलेले तंत्र अधिकारी आणि काही जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. शनिवारी सकाळी अकरा वाजल्यापासून पुण्यातील कृषी आयुक्तालयात कृषी संचालक विकास पाटील यांच्याकडून या छाप्याच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे आणि छाप्यात सहभागी प्रत्येक अधाकाऱ्याकडे चौकशी करण्यात येणार आहे.


राज्यात खरीप हंगामाच्या तोंडावर भेसळखोरांना अटकाव घालण्याच्या नावाखाली अकोला जिल्ह्यात कृषी विभागाकडून काही खाजगी व्यक्तींसह करण्यात आलेली धडक कारवाई वादग्रस्त ठरली आहे. या छाप्यात जप्त केलेली बी-बियाणे, खते, औषधांचे नमुने प्रयोगशाळांमध्ये तपासणीस गेले का? आणि त्याचा अहवाल काय आहे? याची संपूर्ण माहिती या पथकाकडून घेण्यात येणार आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर बी-बियाणे, खते, कीटकनाशके आदी शेतकर्‍यांना वेळेवर पुरवठा होतोय का?, हे पाहण्याच्या नावाखाली एक टीम गठीत करण्यात आली. या टीमने भेसळखोरांवर कडक कारवाई करण्याच्या नावाखाली कृषी विभागाने मागील आठवड्यात खते आणि बियाणांची गोडाऊन असलेल्या अकोल्याला टार्गेट केले होते. मात्र तेथील भरारी पथकांच्या तपासण्यांमध्ये कृषी अधिकार्‍यांसह काही खाजगी व्यक्तींचा सहभाग असल्यावरुन या तपासण्या वादाच्या भोवर्‍यात सापडल्या होत्या. 


आता पावसाळी अधिवेशनात हाच मुद्दा पुढे येऊ शकतो हे ओळखून या कारवाईच्या अहवालावर चर्चा करुन तो अंतिम करण्यासाठी कृषी आयुक्तालयात संचालक विकास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. या बैठकीच्या माध्यमातून या वादग्रस्त छाप्याच्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न तर कृषी विभागाकडून होत नाही ना?, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.


नेमकं काय घडल होतं?


अकोल्यातील एमआयडीसी परिसरात असलेल्या विविध कंपन्यांच्या गोदामांची 7 ते 9 जून या काळात धडक तपासणी करण्यात आली होती. कृषी विभागाच्या पथकांसोबतच काही खासगी व्यक्तींचाही या समावेश होता. त्यामुळे या धाडीची मोहीम प्रचंड वादग्रस्त ठरली होती. त्यानंतर रोधकांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि राज्य शासनावरीही टीका केली होती. या पथकासोबत खासगी व्यक्तींसह कृषिमंत्र्यांचे स्वीय सहायक दीपक गवळी हेसुद्धा सहभागी असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे थेट मंत्र्यांवर टीका केली होती. त्यांनी अकोल्यात एका कार्यक्रमस्थळी पत्रकारांसोबत बोलताना गवळी हे आपले स्वीय सहायक नसल्याचे स्पष्टीकरणही दिले होते. नंतर गवळी हे स्वीय सहायक असल्याबाबतचे एक संभाजीनगर जिल्ह्यातील पत्रही समाज माध्यमात व्हायरल झाले. त्यानंतर आता या सगळ्या अधिकाऱ्यांना आता पुण्यात पाचारण करण्यात आलं आहे. 


अकोल्यातील कृषी विभागाच्या कथित छापेमारीत सहभागी 46 अधिकाऱ्यांची कृषी आयुक्तालयाने दिलेली नावे...


- अजित पिसाळ, तं.अ. गुनि, विकृससं ठाणे 


- प्रवीण भोर, तं. अ. गुनि, विकृससं लातूर


-संजय शेवाळे, तं. अ. गुनि, विकृस नाशिक


- बंडा कुंभार, तं. अ. गुनि, विकृससं कोल्हापूर


- प्रशांत पवार, तं. अ. गुनि, विकृससं छ. संभाजीनगर


- दत्ता शेटे, तं. अ. गुनि, विकृससं पुणे श्री. संदीप पवार, तं. अ. गुनि, विकृससं नागपूर


-आर. एस. जानकर, तं. अ. गुनि, विकृससं अमरावती


-. प्रवीण जाधव, विगुनिनि, कोल्हापूर


- केचे, विगुनिनि, नागपूर


- एस. एच. मोरे, विगुनिनि, लातूर


-अनिल डोईफोडे, विगुनिनि, पुणे 


-आशिष काळूशे, विगुनिनि, छ. संभाजीनगर


- नितेंद्र पानपाटील, विगुनिनि, नाशिक


-किशोर सोनटक्के, जिगुनिनि, वाशिम 


-अंजिक्य पवार, विगुनिनि, ठाणे


-धनंजय पाटील, जिगुनिनि, सोलापूर


- भरत रणवरे, जिगुनिनि, पुणे 


-कल्याण पाटील, जिगुनिनि, यवतमाळ


- राजेंद्र माळोदे, माहीम अधिकारी, यवतमाळ


- बी. वाय. पठारे, जिगुनिनि, ठाणे श्री. जे.बी.सुर्यवंशी, जिगुनिनि, पालघर


-अरुण इंगळे, जिगुननि, बुलढाणा


- विजय कोंडील, मोहीम अधिकारी, बुलढाणा 


-एल. जी. आडे, मोहीम अधिकारी, अमरावती


-महेंद्र सालके, मोहीम अधिकारी, अमरावती


-सुरेंद्र पाटील, जिगुनिनि, सांगली


- राहुल ढगे, जिगुनिनि, अहमदनगर


- सुशांत भोसले, जिगुनिनि, सातारा


- बी. बी. गिरी, जिगुनिनि, नांदेड


- एस. जी. मेश्राम, जिगुनिनि, गडचरोली


- के. डी. सोनटक्के, जिगुनिनि, वाशिम


-पी. एन. म्हसकर, जिगुनिनि, भंडारा


-एस. एम. बोधे, जिगुनिनि, चंद्रपूर श्री. एम. व्ही. खंडाईत, जिगुनिनि, नागपूर


-. नितेंद्र पानपाटील, जिगुनिनि, नाशिक श्री. अरुण तायडे, जिगुनिनि, जळगाव


-मनोजकुमार शिसोदे, जिगुनिनि, धुळे श्री. नरेंद्र पाडवी, जिगुनिनि, नंदुरबार


-सी.पी. भागडे, मोहीम अिधिकारी, वाशिम श्री. ऐतलवाड जि.के. जिगुनिनि, परभणी


-देवकते पी.पी., जिगुनिनि, लातूर श्री.बी.एस. जेवे, जिगुनिनि, हिंगोली


-व्ही. डी. गायकवाड, जिगुनिनि, जालना श्री. जी. डी. सरकलवाड, जिगुनिनि, छ. संभाजीनगर