पुणे : प्रियकराचे लग्न झाल्याचे समजल्याने रात्री त्यांच्यामध्ये झालेल्या वादातून प्रेयसीने प्रियकराच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केला आहे. ही घटना मंगळवारी (3 मार्च)  पहाटे साडे चार वाजता एस के नाईक कंपनी समोर नऱ्हे पुणे येथे घडली. अनुराधा करे ( वय 24. सध्या राहणार: नारायण निवास, नऱ्हे - धायरी रोड, नऱ्हे, पुणे, मूळ : करेवाडी, तालुका: जत, जिल्हा :सांगली) असे आरोपीचे नाव असून महंतेश बिरादार ( वय : 28, रा. संख किरंडी, तालुका :जत, जिल्हा : सांगली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अनुराधा व महंतेश हे बालपणीचे मित्र होते. ते एकाच तालुक्यातील होते. अनुराधा ही सध्या नवले हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कामास होती. गेल्या चार पाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघांनी आळंदी येथे जाऊन विवाह केला होता. परंतु त्यानंतर तो तिला भेटण्यास टाळाटाळ करीत होता. तिने यापूर्वी सिंहगड पोलीस ठाण्यात त्याच्या विषयी तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर सोमवारी (2 मार्च)  रात्री तो दारू पिऊन तिच्या घरी आला.

दरम्यान रात्री त्याने माझे लग्न झाले असल्याचे तिला सांगितले. यावरून त्यांच्या दोघांत वाद झाला. त्यानंतर महंतेश झोपी गेला असता पहाटे साडेचारच्या सुमारास तिने कोयत्याने त्याच्या मानेवर वार करून खून केला. खून झाल्यानंतर तिने पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर तिने तिच्या गावी असलेल्या वडिलांना खून केल्याचे फोन करून कळविले. वडिलांनी पोलीस ठाण्यात जाण्याविषयी सांगितल्याने तिने स्वतः पोलीस चौकीत हजर राहून मी खून केल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी तरूणी स्वत: पोलीस ठाण्यात हजर राहिली.

Palghar News | पालघरमध्ये प्रेयसीच्या आईला आणि बहिणीला जाळण्याचा प्रयत्न, आरोपीला बेड्या



संबंधित बातम्या : 

Honor killing | आंतरजातीय प्रेमसंबंधाच्या रागातून जन्मदात्या आई-वडिलांकडून मुलीची हत्या

स्वच्छंदी वागण्यात अडसर ठरलेल्या वडिलांची मुलाकडून आई आणि मित्रांच्या मदतीने हत्या

शाळेतील शिक्षिकेची हत्या करून मारेकऱ्याचीही आत्महत्या; मुंबईतील घटना