एक्स्प्लोर

'सनबर्न'मध्ये मापात पाप, पेगमध्ये कमी दारु भरल्याने गुन्हा

पुणे : पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हल मागच्या अडचणी काही केल्या दूर होताना दिसत नाहीत. सनबर्नमध्ये दारुचे पेग देताना ठरलेल्या मापापेक्षा कमी दिल्यानं आयोजकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फेस्टिव्हलमध्ये पाण्याची बाटलीही 50 ते 100 रुपयांना विकल्याची तक्रार वैधमापन विभागाकडे दाखल झाली आहे. तक्रारीनंतर वैधमापन विभागानं सनबर्नमध्ये जाऊन पडताळणी केली असता तक्रारींमध्ये तथ्य आढळलं. त्यानंतर सनबर्नवर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. आधीच्या अडचणीत भर विनापरवाना डोंगराचं सपाटीकरण केल्याने, सनबर्न फेस्टिव्हलला तब्बल 62 लाखांचा दंड ठोठावला होता. हवेली तालुक्याच्या प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी ही कारवाई केली. तसंच दंडाची रक्कम तातडीने भरण्याचे आदेशही ज्योती कदम यांनी दिले आहेत. सनबर्न फेस्टिव्हलसाठी केसनंद गावातील डोंगराचं मोठ्या प्रमाणात सपाटीकरण करण्यात आलं. यासाठी तहसीलदार किंवा जिल्हा खनिकर्म विभागाची परवानगी आवश्यक होतं. पण आयोजकांकडून सपाटीकरणासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी आयोजकांना दणका दिला. केसनंद परिसरात डोंगराचं सपाटीकरण, मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली आहे. त्यामुळे त्याविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. सनबर्नकडून 1 कोटी 77 लाखांचा करमणूक कर सरकारने आयोजकांकडून करमणूक करापोटी 1 कोटी 77 लाख रुपयांची वसुली केली आहे. आयोजकांनी 1 कोटीचा डीडी आणि 77 लाखाची रोकड जिल्हा करमणूक कर विभागाकडे जमा केली आहे.

सनबर्न फेस्टिव्हल म्हणजे काय?

28 ते 31 डिसेंबरदरम्यान पुण्याजवळील केसनंदमध्ये सनबर्न फेस्टीव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. सनबर्न हा पूर्णत: व्यावसायिक ईडीएम अर्थात इलेक्ट्रिक डान्स म्युझिक फेस्टिव्हल आहे. ईडीएम यावरुनच हा फेस्टिव्हल कसा असेल, याचा अंदाज बांधता येईल. डीजेचा ठोका, चकाकणारं लाईटिंग आणि बेधुंद तरुणाई असं थोडक्यात वर्णन या सनबर्न फेस्टिव्हलचं करता येईल. हा आशियातील सर्वात मोठा, तर जगातील पहिल्या 10 फेस्टिव्हल्सपैकी एक म्युझिक फेस्टिव्हल असल्याचा दावा करण्यात येतो. वेगवेगळ्या रंगात, वेगवेगळ्या ढंगात, ‘बेफिक्रे’ तरुणाई बेभान होऊन यात सहभागी होतात.  बिनधास्त डान्स, रापचिक म्युझिक आणि धुंदी आणणाऱ्या लाईट्समुळे हा फेस्टिव्हल परिचित आहे. या फेस्टिव्हलमध्ये केवळ म्युझिक आणि डान्स नाही तर विविध कला, खान-पान, थरारक गेम्स, कलाकुसर, हस्तकलांचा मेळा इथे भरतो.  त्यामुळे इथे यायचं आणि इथलंच होऊन जायचं, असं आयोजन करण्यात येतं. सनबर्न फेस्टिव्हलचा इतिहास सनबर्न फेस्टिव्हलचं हे पहिलंच वर्ष नाही. गेल्या 9 वर्षापासून म्हणजेच 2007 पासून गोव्यात हा फेस्टिव्हल सुरु आहे. दरवर्षी इयर एण्डिंगला या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येतं. गोव्यात रुळलेला हा फेस्टिव्हल यंदा पहिल्यांदाच गोव्याबाहेर हलवण्यात आला आहे. निखिल चिनापा ‘गॉडफादर ऑफ डान्स म्युझिक’ आणि MTV वरील ‘रोडीज’ आणि ‘स्प्लिट्स व्हिला’चा अँकर निखील चिनापाने  सर्वात आधी सनबर्न फेस्टिव्हलचं आयोजन केलं होतं.

संबंधित बातम्या :

'सनबर्न'ला आणखी एक दणका, दंडाची रक्कम 1 कोटींवर

सनबर्न फेस्टिव्हलला 62 लाखांचा दंड

पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलचा मार्ग मोकळा!

पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलला 'सनातन'चा विरोध

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget