पुणे : 1 एप्रिलनंतर 50 कोटी रुपयांवरील एलबीटी रद्द करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. पुण्यातील व्यापारी मेळाव्यात अर्थमंत्री बोलत होते. तसंच राज्यात दुष्काळाच्या काळातही विकासदर वाढल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

"वजन कमी करण्यासाठी व्यायाम किंवा जेवण कमी करु नका, तर फक्त एखादा व्यापार टाका, वजन आपोआप कमी होईल," असंही पुण्यातील व्यापारी मेळाव्यात अर्थमंत्र्यांनी सांगितलं. मागच्या वर्षी राज्यात मोठा दुष्काळ होऊनही राज्याचा विकासदर 5 वरुन 8 वर नेण्यात राज्य सरकारला यश आल्याचा दावाही मुनगंटीवारांनी केला.

"आमचं सरकार सर्वसामान्यांसोबत आहे, तसंच व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास प्रयत्नशील आहे. ज्याप्रकारे औषधाची एक्स्पायरी डेट संपल्यानंतर ते औषध शरिराला हानिकारक असतं त्याच प्रकारे राजकारणात ज्या पक्षाची एक्सपायरी डेट संपलेली आहे. त्याना निवडून आणायचं की नाही ते तुम्ही ठरवा,"  असंही मुनगंटीवारांनी व्यापारी मेळाव्यात सांगितलं आहे.