मुंबई : 10 महानगरपालिका आणि 11 जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. मंगळवारी 21 तारखेला हे मतदान होणार आहे आणि 23 फेब्रुवारी म्हणजेच गुरूवारी मतमोजणी केली जाईल. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे प्रत्येक उमेदवारांनी मतदारांपर्यत पोहोचण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. गेल्या काही दिवसांमध्ये सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आपापला प्रभाग आणि गट चांगलाच पिंजून काढला. मात्र आता हा प्रचार थंडावला आहे. यापूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांसाठी जवळपास 69 टक्के मतदान झालं होतं. जिल्हा परिषद पहिला टप्पा – (16 फेब्रुवारीला मतदान, निकाल 23 फेब्रुवारी) औरंगाबाद, जालना, परभणी,  हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा परिषद दुसरा टप्पा – (21 फेब्रुवारीला मतदान, निकाल 23 फेब्रुवारी) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोली

जिल्हा परिषद : मतदान आणि निकालाची तारीख

जिल्हा परिषदमतदानाची तारीखनिकालाची तारीख
रायगड21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
रत्नागिरी21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
सिंधुदुर्ग21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
पुणे21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
सातारा21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
सांगली21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
सोलापूर21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
कोल्हापूर21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
www.abpmajha.in
नाशिक21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
जळगाव16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
अहमदनगर16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
अमरावती21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
बुलडाणा16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
यवतमाळ16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
औरंगाबाद16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
जालना16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
परभणी16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
हिंगोली16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
बीड16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
नांदेड16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
उस्मानाबाद16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
www.abpmajha.in
लातूर16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
नागपूर—–—–
वर्धा16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
चंद्रपूर16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
गडचिरोली16 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
 

या महापालिकांसाठी मतदान

मुंबई ठाणे उल्हासनगर पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर नाशिक अकोला अमरावती नागपूर

संबंधित बातमी : 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांसाठी 69% मतदान