Pune Police on Exam Paper Leak : आरोग्य भरती पेपरफुटीसाठी न्यासा ही जबाबदार असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी म्हटले आहे. पुणे पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणाबाबत आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या पेपरफुटी प्रकरणात सामिल असलेल्या न्यासाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


म्हाडा भरती परीक्षेआधी एका टोळीचा पर्दापाश करण्यात आला होता. या भरती परीक्षेचा पेपर फुटण्याआधीच कारवाई करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात आल्यानंतर आणखी काही जणांना अटक करण्यात आली होती. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज या प्रकरणाबाबत आणखी माहिती दिली. 


२४ ऑक्टोबर रोजी झालेला आरोग्य विभागाचा गट क चा पेपरही फुटला होता. यामध्ये न्यासा कंपनीचे अधिकारी सहभागी होते  अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली. गट 'ड' चा पेपर न्यासाचे अधिकारी आणि बोटले आणि बडगिरे अशा दोन व्यक्तींच्या माध्यमातून फुटला. दोघे एकमेकांशी संबंधित होते का याचा तपास सुरू आहे. गट 'क' चा पेपर फोडण्यात न्यासाच्या अधिकाऱ्यांसोबत  सहभागी असलेल्या दोन दलालांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. 


असा फोडला परीक्षेचा पेपर 


एका पेपरसाठी हे दलाल पाच ते आठ लाख रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे.  न्यासा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी देखील यात सहभागी आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.  न्यासाच्या अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिका प्रिंट करताना पेपर फोडला असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.


इतर महत्त्वाची बातमी:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha