एक्स्प्लोर

डी एस कुलकर्णींची ईडीकडून चौकशी

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांची अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. 900 कोटी रुपये विविध ठिकाणी वळवल्याचा ईडीला संशय आहे.

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांची अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. डीएसके यांच्या कंपन्यांमधील करोडो रुपये कुठे आहेत, याबाबत अंमलबजावणी संचलनालयाने त्यांची चौकशी सुरु केली आहे.

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी एस कुलकर्णी सध्या येरवडा तुरुंगात आहेत. त्यामुळे अंमलबजावणी संचलनालयाचे उपसंचालक अमित भास्कर , उपसंचालक प्रवीण साळुंखे चौकशीसाठी येरवडा तुरुंगात पोहोचले आहेत. डी एस कुलकर्णी यांच्या कंपन्यामधील पैसा नक्की कुठे गायब झाला, कोणत्या खात्यांवर वळवण्यात आला आहे, याबाबत अंमलबजावणी संचलनालयाकडून चौकशी सुरू आहे.

डीएसके यांच्या कंपन्यांमधील जवळपास 900 कोटी रुपये विविध ठिकाणी वळवण्यात आल्याचा संशय अंमलबजावणी संचलनालयाला आहे.

काय आहे प्रकरण? डीएसकेंवर गुंतवणूकदारांची फसवणूक करत तब्बल 2 हजार 43 कोटींच्या घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी कुलकर्णी दाम्पत्यावर 36 हजार 875 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. डीएसके आणि हेमंती यांना 17 फेब्रुवारीला अटक झाली होती. आधी दोघंही पोलिस कोठडीमधे होते, त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.

डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी केलेल्या पैशांच्या गैरव्यवहारात आणखी तिघांचाही समावेश असल्याचं उघड झालं होतं. डीएसकेंच्या भावाचा जावई केदार वांजपे, त्याची पत्नी (डीएसकेंची पुतणी) सई वांजपे आणि डीएसके कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर यांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली होती. केदार वांजपे हा डीएसकेंच्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक होता. ड्रीम सिटीचं अधिग्रहण करण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती.

महत्त्वाच्या बातम्या

साखर आणि तेलानंतर आता कांद्याच्या दरात मोठी वाढ, पण शेतकऱ्यांना फायदा मिळतोय का? प्रति किलोसाठी किती दर? 
साखर आणि तेलानंतर आता कांद्याच्या दरात मोठी वाढ, पण शेतकऱ्यांना फायदा मिळतोय का? प्रति किलोसाठी किती दर? 
गणेशोत्सवात पुण्यात 12 दिवस दारुबंदी; हायकोर्टाने प्रशासनाला फटकारलं, नियमित मद्यपान करणाऱ्यांना आरोग्याच्या समस्या होऊ शकतात
गणेशोत्सवात पुण्यात 12 दिवस दारुबंदी; हायकोर्टाने प्रशासनाला फटकारलं, नियमित मद्यपान करणाऱ्यांना आरोग्याच्या समस्या होऊ शकतात
Pune Metro Ganeshotsav : पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; गणेशोत्सव काळात दर 5 मिनिटांना धावणार मेट्रो, अनंत चतुर्दशीला 41 तास सलग सेवा
पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; गणेशोत्सव काळात दर 5 मिनिटांना धावणार मेट्रो, अनंत चतुर्दशीला 41 तास सलग सेवा
NCP Ajit Pawar: पुण्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! सरपंचासह 6 सदस्य अपात्र; नेमकं काय आहे कारण?
पुण्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! सरपंचासह 6 सदस्य अपात्र; नेमकं काय आहे कारण?

व्हिडीओ

MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
Embed widget