एक्स्प्लोर

पुण्यात फिरत्या विसर्जन हौदावरुन वाद; कचरागाड्या वापरल्याचा मनसेसह ब्राम्हण महासंघाचा आरोप

पुण्यात घरगुती गणपती विसर्जन करण्यावरुन नवीन वाद सुरु झाला आहे. विसर्जन हौद म्हणजे कचराकुंड्या असल्याचा आरोप मनसे आणि ब्राम्हण महासंघाने केला आहे.

पुणे : पुण्यात घरगुती गणपती विसर्जन करण्यावरुन आता नवीन वाद सुरु झालाय. महापालिकेने गणपती विसर्जनासाठी जे फिरते हौद केले आहेत, ते हौद म्हणजे कचराकुंड्या असल्याचा आरोप मनसे आणि ब्राम्हण महासंघाने केला आहे. मात्र, महापालिकेने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. यंदा कोरोनाचं संकट असल्यामुळे प्रशासनाने घरगुती गणपतीचं विसर्जन घरीच करावं, असं आवाहन पुणेकरांना केलं. त्यानंतर महापालिकेकडून 15 क्षेत्रीय भागात 30 फिरते हौद ठेवले आहेत. काल दीड दिवसांच्या गणपतीच विसर्जन बहुतेक जणांनी याच हौदात केलं. मात्र, महाराष्ट्र निर्माण सेना, ब्राम्हण महासंघ यांनी फिरते हौद हे कचराकुंड्याच्या गाडीत करत असल्याचा आरोप करत आंदोलनाचा इशारा दिलाय. काल विसर्जन सुरु असताना हौदामधील विसर्जन मनसेने बंद पाडलं. तसेच हे हौदामधील विसर्जन थांबवले नाही तर हौद पाडून टाकू, अस म्हटलंय. मुंबई लोकल आणि ई पास बाबत घाईगडबडीत निर्णय घेणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महापालिकेने आरोप फेटाळले पुण्यामध्ये गणपती विसर्जनासाठी कचराकुंड्या दिल्याचा आरोप महापौर मुरलीधर मोहोळ यांनी फेटाळलाय. गेल्या वर्षी वापरण्यात आलेले विसर्जन हौदच यावर्षी फिरते हौद म्हणून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. असं असताना काही लोक संकुचित राजकारण करुन पुणे शहराचे नाव बदनाम करत असल्याचा प्रत्यारोप महापौरांनी केला आहे. या पार्श्‍वभूमीवर महापौरांनी कचऱ्याची गाडी आणि फिरते विसर्जन हौद अशा दोन्ही गाड्या माध्यमांसमोर आणल्या. गेल्यावर्षी 14 हजार मूर्तींचं विसर्जन करण्यात आले होते. यंदा फिरत्या हौदात 679 तर 610 मूर्ती दान केल्या आहेत. जवळपास 12 हजार 700 जणांनी गणपतीचे घरीच विसर्जन केले. पुणे शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गणेशोत्सव साध्यापणाने साजरा करण्याच निर्णय घेतला. मात्र, गणपती बसण्याअगोदर मंडपात की मंदिरात गणेशोत्सव साजरा करायचा हा वाद होता. तर आता गणपती विसर्जित करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. Ganeshotsav 2020 | पुण्यातल्या तांबडी जोगेश्वरीच्या गणरायाची आरती! घरबसल्या घ्या बाप्पाचं दर्शन!

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
Pune Dahi Handi : राधा पाटील पाठोपाठ निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 जणींवर गुन्हा; दहीहंडीतील अश्लील नृत्यावर पुणे पोलिसांचा बडगा
राधा पाटील पाठोपाठ निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 जणींवर गुन्हा; दहीहंडीतील अश्लील नृत्यावर पुणे पोलिसांचा बडगा
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पावसाची 16 टक्के तूट; आता मान्सून कधी कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पावसाची 16 टक्के तूट; आता मान्सून कधी कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती

व्हिडीओ

DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
Embed widget