पुणे : कोविडची बाधा झाल्याने पुण्यातील (Corona Virus) निवासस्थानी क्वारंटाईन राहून उपचार घेत असलेले कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आज अॅक्शन मोडवर (corona Positive) आलेले पाहायला मिळाले. धनंजय मुंडे  (Actione Mode ) यांनी घरूनच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या (Maharashtra Council for Agricultural Education and Research) 113व्या बैठकीस ऑनलाइन पध्दतीने उपस्थिती लावली. या बैठकीत कृषी परिषदेच्या 112व्या बैठकीचा कार्यपूर्ती अहवाल व इतिवृत्त मंजुरीसाठी सादर करण्यात आले. कृषिमंत्री धनंजय मुंडे हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. या बैठकीच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. 


धनंजय मुंडे हे मागील 5 ते 7 दिवसांपासून कोविड बाधित असून ते पुणे येथील निवासस्थानी उपचार घेत आहेत. आजपासून त्यांनी ऑनलाइन पद्धतीने कामकाजास सुरुवात केली आहे. 24 डिसेंबर 2023 ला धनंजय मुंडे यांनी यांनी ट्वीट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, "नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली असता पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मला सध्या फारसा त्रास नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील 4 दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही."



भारतातही कोराना रुग्णांच्या संख्येत वाढ - 


मागील 15 दिवसांमध्ये देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतामध्ये सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 3742 इतकी झाली आहे. जेएन.1 या नव्या व्हेरियंटचेही रुग्ण वाढत आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सक्रीय रुग्णांच संख्या दुपट्ट झाली आहे. जगभराप्रमाणेच भारतामध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. 


भारतात किती धोका ?


मागील काही दिवसांतील कोविड डाटाच्या रिपोर्ट्सनुसार, भारतात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहेत. येत्या काही दिवसांत रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पण सध्या असलेला व्हेरियंट आधीसारखा धोकादायक नाही. आतापर्यंत, कोविडची लागण झालेल्यांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढलेले नाही. ज्या रुग्णांना आधीच कुठल्यातरी गंभीर आजाराने ग्रासले आहे, अशा रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, पण काळजी घ्यायला हवी.


इतर महत्वाची बातमी-


चंद्रकांत पाटलांनंतर थेट राज्यपालचं बोलले, अजितदादांचा नंबर लागलाच नाही, बोलू दिलं नाही की बोलणं टाळलं?