पुणे जिल्ह्यातील पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

पुणे शहर व जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून आढावा घेतला. यानंतर त्यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

Continues below advertisement

मुंबई : ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक संसार उघड्यावर आलेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाची संवाद साधून जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Continues below advertisement

चक्रीवादळाच्या संकटकाळात मदतकार्यात सहभागी झालेले लाईफ गार्ड, पोलीस, संरक्षण दलांचे, एनडीआरएफचे जवान, स्थानिक स्वराज संस्थांचे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आपत्कालिन यंत्रणेतील, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, नगारिकांचे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर आभार मानले आहेत. पुणे शहरात तसंच मावळ, आंबेगाव, जुन्नर, खेड, वेल्हे, मुळशीसह इतर तालुक्यातही वादळानं मोठे नुकसान केले आहे. घरं, शाळा, अंगणवाड्या, गुरांचे गोठे, भाजीपाल्याची पिके, फळबागांचं झालेलं नुकसान प्रचंड आहे. पोल्ट्री शेड, कांदा चाळी, पॉली हाऊसचे पत्रे उडून गेल्याचे प्रकार घडले आहेत. वीजेच्या तारा व खांब मोडून पडल्यानं वीजयंत्रणेचंही नुकसान झालं आहे.

महाराष्ट्रात पावसाची दमदार ओपनिंग, गेल्या 24 तासात 27.7 मिमी पावसाची नोंद

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात सर्वाधिक नुकसान या वादळामुळे झाले आहे. मुळशी तालुका हा कोकण भागाला अत्यंत जवळ आहे. ताम्हिणी घाट ओलांडल्यावर कोकण हद्द सुरु होते. त्यामुळे साहजिकच या भागात घाटमाथ्यावर वादळाचा परिणाम होऊन मोठा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानेही वर्तवली होती. त्यानुसार काल दिवसभर वादळी पाऊस झाल्याने या तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांचे पत्रे उडून गेले, भिंती खचल्या, तर शेतामध्येही पाणी जाऊन मोठे नुकसान झाले आहे.

पुणे जिल्ह्यात आणखी एक-दोन दिवस पावसाचा जोर कायम पुणे जिल्ह्यात आणखी एक-दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधून सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करुन नुकसानीबद्दलची माहिती जाणून घेतली. पंचनामे पूर्ण होऊन अहवाल येताच मदतीबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Nisarg Effect in Mulshi | निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याला फटका; अनेक संसार उघड्यावर

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola