एक्स्प्लोर

PCMC News: विकासकामे जाणीवपूर्वक रखडवली तर खपवून घेणार नाही; महेश लांगडेंनी पालिका अधिकाऱ्यांना धरलं धारेवर

पिंपरी चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात सुरू झालेली विकासकामे जाणीवपूर्वक रखडवली जात असल्याचा आरोप करत आमदार महेश लांडगेयांनी पुन्हा पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

PCMC News: पिंपरी चिंचवड महापालिकेत (PCMC) भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात सुरू झालेली विकासकामे जाणीवपूर्वक रखडवली जात असल्याचा आरोप करत आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी पुन्हा पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रशासकीय काळात रखडलेली कामे तातडीने मार्गी लावावी. आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पातून शहराला पाणी देण्याबाबत प्रशासनाची संथ गतीची कारवाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार लांडगे यांनी चिंचवडच्या ऑटो क्लस्टर सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या शहरातील रखडलेल्या कामांवर त्यांनी लक्ष केंद्रीत केलं होतं. आमदार लांडगे यांनी शहरातील समस्या सोडविण्याचे आदेश दिले. त्रिवेणीनगर येथील रस्त्याचे काम पूर्ण करावे, बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी. ताळगाव चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम तातडीने सुरू करावे, टाऊन हॉलच्या कामाला गती द्यावी, अशा सूचना देखील केल्या

चिखली ते चर्‍होली दरम्यान पालिकेने संपादित केलेल्या जागेत गाय कोठार विकसित करता येईल का, याची पडताळणी करावी. भोसरी थोरल्या पादुका चौकातील संत शिल्प आणि भित्तीचित्रांचे काम लवकर पूर्ण करावे. भोसरीत बाल रुग्णालयाचे नियोजन करावे. कुस्ती संकुल व भोसरीतील कबड्डी संकुलात खेळाडूंना राहण्याची सोय करावी. यासाठी 120 खाटांची क्षमता असलेल्या वसतिगृहाचे काम लवकर करण्यात यावे. यमुनानगर, निगडी परिसरातील अनेक घरांवर रेड झोन मार्किंग होत आहे, ते निश्चित करण्यात यावे. रेड झोनची व्याख्या संरक्षण खात्याने करावी, अशा विविध मागण्याही त्यांनी केल्या.

 आंध्र, भामा आसखेड प्रकल्प, क्रिकेट स्टेडियम, सफारी पार्क, मोशी तसेच पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि चिखली रुग्णालयाच्या जागेबाबत संबंधित विभागांसोबत तातडीची बैठक घेण्याचे आदेश दिले. कणबे चौक ते भक्ती-शक्ती चौक हा रेड झोनमधून पुनर्विकास करण्यासाठी अहवाल सादर करावा. अनेक सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद आहेत. याबाबत सर्वेक्षण करून संबंधितांवर कारवाई करावी. आमदार लांडगे यांनीही पर्यावरण संवर्धनासाठी विविध सूचना केल्या आहेत.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
Embed widget