पिंपरी-चिंचवड : मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास (Maval Loksabha election 2024) आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere) यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. आमदार अण्णा बनसोडे यांच्या जेष्ठ कन्येच्या विवाह सोहळ्याला दोघांनी हजेरी लावली होती. त्यावेळी वाघेरे आणि अजित पवार आमोरा-समोर आले आणि थेट पाया पडले. यावेळी अजित पवार काही वेळ अवघडल्याचं दिसून आलं. 



अजित पवार आणि संजोग वाघेरे पाटील हे काल पिंपरी विधानसभा क्षेत्राचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या जेष्ठ कन्येच्या विवाह सोहळ्यास काल रात्री उशिरा एकाच  व्यासपीठावर आले होते. अजित पवार लग्न समारंभात आल्याच्या अगदी काही मिनिटांनी संजोग वाघेरे पाटील हे देखील वधू-वरास आशीर्वाद देण्यास व्यासपीठावर आले. त्यावेळी संजोग वाघेरे पाटील यांना अजित पवार व्यासपीठावर उभे दिसताच त्यांनी अजित पवार यांना वाकून नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला आहे.


मावळ लोकसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे काही महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक होते. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला  जय महाराष्ट्र करत शिवसेना उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश केला होता. 2019 च्या मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचा दारुण पराभव केला होता. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार हे श्रीरंग आप्पा बारणे यांचं महायुतीत प्रचार करताना दिसत आहेत. असं असताना त्यांच्या काही महिन्यापूर्वीचे खंदे समर्थक तसेच 2024 चे महाविकास आघाडीचे मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आपल्या पूर्वीच्या नेत्याला निवडणुका पूर्वी नमस्कार  करून त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. 


मात्र अजित पवार यांनी संजोग वाघेरे यांच्या पाटील यांच्यासोबत लग्न समारंभात जेवण करत असताना त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं टाळलं आहे. महाराष्ट्राला एक वेगळी राजकीय संस्कृती आहे. आणि हीच महाराष्ट्रातील खेळी - मेळीच राजकीय संस्कृती जपण्यासाठी मी अजित पवार यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला. यात वावगं काही नाही,  अशी प्रतिक्रिया संजोग वाघेरे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. 



इतर महत्वाची बातमी-


Bus Accident : इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खासगी प्रवाशी बस दरीत कोसळली; 28 जण जखमी


Ravindra Dhangekar : पुण्यात महाविकास आघाडीत धूसफूस सुरुच; उद्धव ठाकरेंच्या सभेवरुन पदाधिकाऱ्यांमध्ये


वादावादीमाधवराव शिंदेंच्या मृत्यूबाबत उदयनराजेंचं मोठं विधान, काँग्रेसवर गंभीर आरोप; म्हणाले...