एक्स्प्लोर

Darshana Pawar: दर्शनाच्या हत्येचा प्लॅन तयार होता; हत्या करण्यासाठी राहुल हांडोरेने सोमवारच का निवडला? पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर

MPSC टॉपर दर्शना पवारची हत्या करण्याचं राहुल हांडोरेने आधीच ठरवलं होतं असं आता समोर आलं आहे. कारण दर्शना पवारवर हल्ल्ला करण्यासाठी राहुल हांडोरेने धारदार कटर सोबत नेलं होतं.

Darshana Pawar Murder Case :  MPSC टॉपर दर्शना पवारची हत्या करण्याचं राहुल हांडोरेने आधीच (darshana pawar) ठरवलं होतं, असं आता समोर आलं आहे. कारण दर्शना पवारवर हल्ल्ला करण्यासाठी राहुल हांडोरेने धारदार कटर सोबत नेलं होतं. या कटरने वार केल्यानंतर हांडोरेने दगडांनी दर्शनावर हल्ला केला आणि तिची हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. 

Darshana Pawar Murder Case :  राहुलने दर्शनाकडे पुन्हा एकदा लग्नाचा विषय काढला पण...

दर्शना पवारची हत्याच करायची याच उद्देशाने राहुल हंडोरे 12 जूनला राजगडाच्या पायथ्याशी पोहचला. राजगडावर ट्रेकिंगला जायचं हा केवळ बहाणा होता. ट्रेकच्या पहिल्या टप्प्यावर पोहचताच राहुलने दर्शनाकडे पुन्हा एकदा लग्नाचा विषय काढला. मात्र तिनं नकार देताच सोबत आणलेल्या कटरने राहुलने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी होऊन दर्शना खाली कोसळल्यावर राहुलने मोठ्या दगडांनी तिच्यावर घाव घातले ज्यामध्ये दर्शनाचा मृत्यू झाला. 

Darshana Pawar Murder Case : हत्येसाठी सोमवार का निवडला?

12 जूनला सोमवार होता. राजगडावर ट्रेकला जाणाऱ्यांची शनिवार आणि रविवार या दोन दिवशी मोठी गर्दी असते. मात्र दर्शनाची हत्याच करायची हे ठरवलेल्या राहुल हांडोरेने मुद्दाम सोमवारचा कमी गर्दीचा दिवस निवडला होता. सीतेचा माळ या ठिकाणी दर्शनाची हत्या होताना सोमवार असल्यानं आजूबाजूला कोणीही नव्हतं. त्यामुळं बरेच दिवस हत्येचा हा प्रकार उघडकीस आला नाही. याकाळात राहुल हांडोरेने अनेक राज्यांमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला. 

Darshana Pawar Murder Case :  कोण-कोणत्या राज्यात पळ काढला..

राजगडाच्या पायथ्याशी हत्या केल्यानंतर राहुलने खेड शिवापूरच्या टोल नाक्याजवळ आपली गाडी पार्क केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सापडू नये म्हणून त्याने थेट पुणे स्टेशन गाठलं आणि सांगलीला गेला. त्यानंतर तो ट्रेनने गोव्याला गेला त्यानंतर त्यानं पोलिसांना चकवा देत थेट चंदीगढ गाठलं आणि त्यानंतर त्याने कोलकाता गाठलं आणि अखेर तो मुंबईत आला. हे सगळं करत असताना पुणे पोलीस त्याचा शोध घेतच होते. अखेर त्याला मुंबईतील अंधेरी परिसरात पोलिसांनी जेरबंद केलं. 

Darshana Pawar Murder Case :  अखेर हत्या केलीच...

राहुल हंडोरे आणि दर्शना पवार लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते . पुण्यात दोघेही एमपीएससीची तयारी करत होते. मात्र दर्शना वन खात्याची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि तिच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी करून द्यायची तयारी सुरु केली. राहुल हांडोरेने दर्शना आणि तिच्या घरच्यांना सांगून पाहिलं की मला थोडा वेळ द्या, मी देखील एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होईन आणि दर्शनाशी लग्न करेन. पण दर्शना आणि तिच्या घरच्यांनी याला नकार दिल्यानं राहुल हांडोरेने दर्शनाच्या हत्येचा कट रचला आणि तो राजगडाच्या पायथ्याशी अंमलात आणला. 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Pune Rain Alert : पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
Pune Police: तपासाच्या नावाखाली 'कास पठार'ची सफर अंगलट; महिला अधिकाऱ्यासह 3 पोलिसांना दणका; दोन वर्षांची इन्क्रीमेंट थांबवली
तपासाच्या नावाखाली 'कास पठार'ची सफर अंगलट; महिला अधिकाऱ्यासह 3 पोलिसांना दणका; दोन वर्षांची इन्क्रीमेंट थांबवली

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Chaudhari Audio Clip: 'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Devoleena Bhattacharjee On Reservation Comment: 'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
Pune Rain Alert : पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
Embed widget