पुणे : पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या दानपेट्या सकाळी उघडण्यात आल्या. यावेळी भाविकांच्या दानाची धर्मदाय आयुक्तालयाच्या निरक्षकांच्या हजेरीत मोजदाद सुरु आहे. सुट्ट्या पैशांच्या कमतरतेमुळे दगडूशेठ ट्रस्टने स्वतःहून धर्मदाय आयुक्तांना पत्र लिहून मोजणीची मागणी केली.


दान आणि देणगी स्वरूपात जमा होणाऱ्या चलनी नोटा,  नाणी त्याच दिवशी संबंधित बँकांमध्ये जमा करण्याचे आदेश राज्यातील सर्व देवस्थाने आणि धर्मादाय संस्थांना देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार राज्याच्या विधी व न्याय विभागाने यासाठी परिपत्रक काढलं आहे. या आदेशाचे पालन करणं देवस्थान व धर्मादाय संस्थांना बंधनकारक आहे. देवस्थानांमध्ये राज्यातील सर्व मोठ्या देवस्थानांचा समावेश असेल.