पुणे: लहान मुलांवरील अनैसर्गिक बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यातील अटक आरोपीने येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. त्याला न्यायालयाने नुकतीच फाशीची शिक्षा सुनावली होती.
हाडकसिंग ऊर्फ खाडकसिंग जलसिंग पांचाळ (वय ३८) असे त्याचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशमधील आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून व अनैसर्गिक बलात्काराच्या गुन्ह्यात तो आरोपी होता. त्याने एका अल्पवयीन मुलावर अत्याचार करीत त्याचा खून केला होता.
2013 साली त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टानं त्याची कारागृहात रवानगी केली होती. तपासादरम्यान त्याने 2011 मध्ये अशाच प्रकारचे आणखीही गुन्हे केल्याचे समोर आले होते.
दरम्यान, न्यायालयाने 22 सप्टेंबर 2016 रोजी त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. पण शुक्रवारी पहाटे त्याने लाकडी खुंटीला कापडाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.