पुणे: पुण्यात मित्रांनी एकाला नग्न करत त्याच्या प्रायव्हेट पार्टला आयोडेक्स लावल्याची संतापजन घटना समोर आली आहे. पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये तीन मित्रांनी मिळून जबरदस्तीने एका मित्राला कपडे काढायला भाग पाडून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर 'आयोडेक्स' लावण्यास सांगितलं. त्यानंतर त्याच्या त्या नग्नावस्थेतील व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघांना अटक करण्यात आली आहे.
श्रेयस संजय कवडे (वय वर्षे 19, हिंजवडी, मूळ रा. धाराशिव), ललित प्रमोद भदाने (वय वर्षे 21, हिंजवडी, मूळ रा. धुळे), राम तुळशीराम गंभीरे (वय वर्षे 35, हडपसर, मूळ रा. लातूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी 20 वर्षीय पीडित तरुणाने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी सात जणांनी आयुष्य संपवलं
पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी सात जीवन संपलल्याच्या (Pune Crime News) घटनांची नोंद झाल्याची माहिती आहे. गौरव अगम (वय वर्षे 28) या तरुणाने खिडकीतून भिंतीला आलेल्या लोखंडी ब्रकेटला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या (Pune Crime News) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. 27) सकाळी साडेदहाच्या सुमारास समोर आली आहे. दुसऱ्या घटनेत प्रसाद संजय अवचट (31, रा. पुनावळे) याने सोमवारी (दि. 27) दुपारी साडेचारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या (Pune Crime News) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
तिसऱ्या घटनेत विकास मुरगुंड (35) यांनी भोसरीतील गणपत लांडगे चाळीत साडीच्या साह्याने गळफास घेत (Pune Crime News) आपलं जीवन संपवलं. ही घटना सोमवारी (दि. 27) दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली. चौथ्या घटनेत मनाप्पा चव्हाण (52, रा. शिंदेवस्ती, नेरे, ता. मुळशी) यांनी घराशेजारील लिंबाच्या झाडाला डोक्याच्या पटक्याने गळफास घेऊन जीवन (Pune Crime News) संपवलं. पाचव्या घटनेत सुवर्णा श्रीराम पवार (36, रा. ढोरेनगर, जुनी सांगवी) या महिलेने घरात छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री ही घटना उघडकीस आली. सहाव्या घटनेत नवनाथ पवार (46, रा. थेरगाव) यांनी घराच्या बेडरूममध्ये बेडशीटच्या साह्याने गळफास घेतला. (Pune Crime News) चिखली परिसरात घराच्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून दिनेश सुरेश लोखंडे (40, रा. चिखली) या व्यक्तीने आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना रविवारी (दि. 26) रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. या सर्व घटनांनी एकच खळबळ उडाली आहे.