एक्स्प्लोर

भाजप आमदार राम सातपुतेंच्या लग्नात कोरोनाविषयक नियमांचा 'बॅण्ड'

माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांचा शाहीविवाह पुण्यात पार पडला. सर्वसामान्यांना 50 पाहुण्यांची मर्यादा असताना राम सातपुतेंच्या लग्नात हजारोंची गर्दी पाहायला मिळाली. एवढंच नाही तर कोरोनाविषयक नियमही धाब्यावर बसवण्यात आले.

पुणे : कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क वापरा, नियम पाळा असं आवाहन पंतप्रधानांसह मुख्यमंत्री वांरवार करताना दिसतात. मात्र आमदारच या नियमांना हरताळ फासताना दिसत आहेत. माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांचं काल (20 डिसेंबर) पुण्यात थाटामाटात लग्न पार पडलं. मात्र या लग्न सोहळ्यात कोरोनाविषयक नियमांना तिलांजली देण्यात आली. लग्न किंवा इतर सामाजिक सोहळ्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 50 पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती नको आणि सोशल डिस्टन्ससह मास्क वापरणे बंधनकारक आहे. परंतु राम सातपुते यांच्या विवाह सोहळ्यात या सगळ्याच नियमांचा बॅण्ड वाजवण्यात आला. त्यांच्या लग्नात नेत्यांसह हजारो लोक उपस्थित होते. जे नेते राम सातपुते यांच्या लग्नाला उपस्थित होते त्यांनीही बेफिकीरी आणि हलगर्जीपणाचं दर्शन घडवलं. अनेक नेत्यांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हताच पण त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचही पालन केलेलं नव्हतं. सातपुते यांच्या लग्नात अक्षरशः सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याने कोरोना हद्दपार झाला की काय अशी चर्चा ही रंगली होती. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी लग्नाला हजेरी लावली होती. आमदार सातपुते यांचा साखरपुडा झाल्यानंतर ही सातपुते विविध मुद्द्यांवरुन चांगलेच ट्रोल झाले होते. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यास राज्यातील मातब्बर नेत्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी कायद्याचं उल्लंघन केल्यानंतर कारवाईला सामोरे जावं लागतं. त्यामुळे ज्या लग्न सोहळ्यात नियमच स्वाहा करण्यात आले त्यावर कारवाईच्या अक्षता पडणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावर नाराजी प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील यांच्यासह लग्नात उपस्थित असलेल्या अनेकांनी फोटो शेअर करत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. मात्र लग्नातली गर्दी पाहून सोशील मीडियावर सातपुते यांच्यावर टीकाही होऊ लागली. सर्वसामान्यांसाठी 50 पाहुण्यांची अट असताना राम सातपुतेंच्या लग्नात शेकडो लोक उपस्थित होते. एवढंच नाही तर उपस्थित असलेल्या नेत्यांनी कोरोनासंबंधित नियमही धाब्यावर बसवल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nirmala Nawale : कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंची मोठी झेप; राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निवड
कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंची मोठी झेप; राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निवड
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Paraded Case : अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
Embed widget