एक्स्प्लोर
पिंपरीत दाम्पत्याची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
फ्लॅटचा दरवाजा उघडला जात नव्हता. संशय आल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता दाम्पत्याने आत्महत्या केल्याचं उघड झालं.
पिंपरी चिंचवड : पुण्यात दाम्पत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. चाकणच्या काळूस रोड परिसरात सोमवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली.
महादेव गोरोबा शिंदे (वय 45 वर्ष) आणि लक्ष्मी गोरोबा शिंदे (वय 35 वर्ष) असं मृत पती पत्नीचं नाव आहे. फ्लॅटचा दरवाजा उघडला जात नव्हता. संशय आल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता दाम्पत्याने आत्महत्या केल्याचं उघड झालं.
मूळचं उस्मानाबादचं असलेलं शिंदे दाम्पत्य शिवगंगा हौसिंग सोसायटीत राहत होतं. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास या दाम्पत्याने मुलांना घराबाहेर काढून किचनमधील सिलिंग फॅनला गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. रात्री उशिरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement