पुणे : देशामध्ये कोरोना व्हायरसचा कम्युनिटी स्प्रेड सुरु झाल्याचा दावा इंडियन मेडिकल असोसिएशन कडून करण्यात आला आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली. सरकारकडून अजूनही कम्युनिटी स्प्रेड झाल्याच्या दाव्याला दुजोरा मिळालेला नाही. पण कम्युनिटी स्प्रेड रोखणं का महत्त्वाचे आहे आणि ते कसं केलं जाऊ शकतं.
कोरोनाच्या प्रसाराचे चार टप्पे मानले जातात. यातला तिसरा टप्पा हा कम्यूनिटी स्प्रेड होणं आहे. कम्युनिटी स्प्रेड म्हणजे समुहात या व्हायरसचा प्रसार होणे आणि समुदायात याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाल्यामुळे त्या संसर्ग झालेल्या व्यक्तीला हा संसर्ग कुठे, कधी आणि कुणामुळे झाला याचा शोध घेणं कठीण बनतं. इंडियन मेडिकल असोसिएशनकडून काल देशात कम्युनिटी स्प्रेड सुरु झाल्याचा दावा करण्यात आला आणि एकच खळबळ उडाली. पण सरकारकडून अजून अधिकृतपणे याला दुजोरा देण्यात आलेला नाही.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कोरोनाच्या संक्रमणाचे हे प्रमुख कारण आहेत. कोरोना व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे व्यक्ती कोरोना संक्रमित होऊ शकते. संक्रमित व्यक्तीच्या शिंकण्यातून किंवा खोकण्यातून बाहेर आलेल्या लाळेच्या थेंबांमधून संक्रमण होऊ शकतं. तसंच आता हवेतूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो असंही सागंतिलं आहे. यामुळे कम्युनिटी स्प्रेड रोखण्यासाठी तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे. याचे कोणते मार्ग असू शकतात ते जाणून घेऊया.
समूह संसर्गाची साखळी तोडण्यासाठी काय करायला हवं?
- प्रत्येकाने योग्य मास्क घालायला हवा.
- सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळणे.
- जिल्हा आणि तालुका पातळीवर नियोजन करणे.
- एखाद्या गावात केसेस नाहीत पण त्याच तालुक्यांतील दुसऱ्या गावात केसेस आहेत. अशा परिस्थितीमध्ये गावागावांमधला संपर्क टाळला पाहिजे. लोकांनी एका गावातून दुसऱ्या गावात जाणं टाळलं पाहिजे.
- टेस्ट आणि ट्रेसिंग वाढवणं.
- लक्षणं दिसल्यावर लगेच वैद्यकीय मदत घेणे.
भारतामधले कोरोनाग्रस्तांचे आकडे रोज वाढतच आहेत. पण आपण कम्युनिटी स्प्रेडच्या टप्प्यात जाणार नाही किंवा गेलो असू तर त्यातून बाहेर पडू यासाठी नेटाने प्रयत्न करणं गरजेचं बनलं आहे.
व्हॉल्व असलेला एन-95 मास्क वापरणे सुरक्षित नाही? व्हॉल्व्ह असणारा मास्क धोकादायक, तज्ज्ञांचं मत