पुणे : परीक्षा आटोपल्यानंतर एप्रिल, मे, जून हा पर्यटनासाठी पसंतीचा काळ असतो, पण यावर्षी कोरोना व्हायरसच्या धास्तीमुळे या सीझनमधील पुण्याच्या टूर ऑपरेटर्सकडील आतापर्यंत 90 टक्के टूर कॅन्सल झालं असल्याची माहिती असोसिएशन ऑफ डोमेस्टिक टूर ऑपरेटर्स ऑफ इंडिया (एडीटीओआय) यांच्याकडून देण्यात आली. पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली.


कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा फटका देशांतर्गत आणि परदेशी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर बसताना दिसत आहे. भारतामधील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यावर टूर कॅन्सल करण्याच्या प्रमाणातही वाढ झाल्याचं दिसत आहे. आधी बूक केलेले टूर गेल्या 15 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅन्सल करण्यात आल्या. याचा फटका पर्यटन व्यावसायिकांना बसतोच आहे. 'या सीझनमध्ये जवळपास 25 हजार पर्यटकांचं बुकिंग असतं. पण यावर्षी 90 टक्के टूर कॅन्सल झाले आहेत', अशी माहिती एडीटीओआयचे सदस्य सुरेंद्र कुलकर्णी यांनी दिली.


पाहा व्हिडीओ : Coronavirus | पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाची संशयित महिला रुग्ण आढळली



एडीटीओआयकडून एक आवाहनही करण्यात आलं आहे. पर्यटकांनी घाबरुन न जाता सरसरकट सगळे टूर कॅन्सल करु नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. केंद्र सरकारने दिलेल्या ट्रॅव्हल अॅडवायजरी वाचून देशांतर्गत पर्यटन करण्याला प्राधान्य द्यावे, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.


Coronavirus | कोरोनाबद्दल हे माहित असायलाच हवं!


दुसरीकडे मात्र टूर कॅन्सल करण्याचा फटका पर्यटकांना बसताना दिसत आहे. कारण टूर कॅन्सल केल्यावर लगेचंच त्यांना पैसे परत मिळत नाहीत किंवा खूप जास्त प्रमाणात कपात करुन ती रक्कम मिळेल असं टूर ऑपरेटर्सकडून सांगण्यात येत आहे. बुकिंग रद्द केल्यावर हाॅटेल, विमान कंपन्या, तसेच इतर सप्लायर यांच्याकडून कॅन्सलेशन रक्कम आल्याशिवाय ग्राहकांना रक्कम परत करणं शक्य नसल्याचं टूर ऑपरेटर्सनी सांगितलं आहे.


याचसंदर्भात पुण्यातील क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून याविषयाकडे त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टूर रद्द केलेल्या पर्यटकांचं नुकसान होऊ नये याची दक्षता घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. बुकिंग रद्द करावे लागल्यास अत्यल्प चार्जेस लावून रद्द करावेत, अशीही मागणी त्यांनी केली आहे.


संबंधित बातम्या : 


Coronavirus | कोरोना आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन; विधीमंडळाच्या परिसरात एकच चर्चा...


coronavirus | कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेच्या अनुभवाची पोस्ट व्हायरल