मुंबई : पुण्यात कोरोना व्हायरसचे पाच रुग्ण आढळल्यानंतर सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. आता पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोना व्हायरसची संशयित महिला रुग्ण आढळली आहे. संबंधित महिला 27 फेब्रुवारीला दुबईतून भारतात परतली होती. त्यानंतर कालपासून तिच्यात कोरोनाची लक्षणं दिसून येत होती, तिला याचा त्रासही होऊ लागला होता. तातडीने खबरदारी म्हणून महिलेला पुण्याच्या नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


या महिलेसह तिच्या कुटुंबातील आठ व्यक्तींनाही नायडू रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या सर्वांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर या सर्वांना कोरोनाही लागण झाली आहे का, हे स्पष्ट होईल. संबंधित महिला 21 फेब्रुवारीला दुबईत गेली होती. त्यानंतर भारतात परतल्यानंतर ती कुणाकुणाला भेटली याचीही माहिती आता घेतली जात आहे.


कोरोनाग्रस्त दाम्पत्याच्या मुलीसह टॅक्सीचालकही पॉझिटिव्ह


राज्यात कोरोनाचे पाच रुग्ण


पुण्यातील एका दाम्पत्यासह त्यांच्या संपर्कात आलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. हे दाम्पत्य दुबईहून आले होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने त्यांच्या निकटवर्तीयांचाही शोध घेणे सुरु केला आहे. या दाम्पत्याची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने या दाम्पत्याने मुंबई-पुणे प्रवास केला, तो टॅक्सी ड्रायव्हर आणि त्यांचा विमानातील सहप्रवासी हे तिघेही कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे. दरम्यान, हे पाच रुग्ण अनेकांना भेटले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


Coronavirus | राज्यात कोरोनाचे पाच रुग्ण, मुंबईत एकही रुग्ण आढळलेला नाही : राजेश टोपे


Coronavirus Outbreak | पुण्यातल्या दाम्पत्याच्या मुलीसह विमानातल्या सहप्रवाशाला कोरोनाची लागण