पुणे : राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा 17 वर गेला आहे. पुण्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढलाय. त्यामुळे पुण्यातला आकडा 10 वर गेला आहे. तर पुण्यात 311 कोरोना संशयित देखरेखीखाली आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता पुण्यात 10, मुंबईत 3, ठाण्यात एक, भिवंडीत एक आणि नागपुरात 2 कोरोनाग्रस्त आहेत.

Continues below advertisement


पुण्यातील सध्यस्थितीची माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर म्हणाले की, 'कोरोनाच्या धास्तीचा गैरफायदा घेऊन जास्त किमतीत मास्क आणि सॅनिटायझरची विक्री करणाऱ्या चार मेडिकलवरही कारवाई करण्यात आली आहे. या चारही मेडिकलला सील करण्यात आलं आहे. तसेच जे जास्तीची किंमत लावून सॅनिटायझरची विक्री करतील त्यांच्यावर यापुढेही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिली आहे.


पुढे बोलताना डॉ. दीपक म्हैसकर यांनी सांगितले की, '235 आतंररूग्ण होते, त्यामधी 211 जणांना घरी पाठवण्यात आलं आहे. त्यातील 233 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आधी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण होते. त्यात आणखी एका रूग्णाची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून पुण्यातला आकडा 10 वर गेला आहे. ही व्यक्ती अमेरिकेतून आली आहे. यात जे परदेशातून आले त्यांचा पाठपुरावा करण्यात आला.'


पाहा व्हिडीओ : coronavirus death | देशात कोरोनाचा पहिला बळी; कर्नाटकातील 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू 



'311 जण सध्या विलगीकरणासाठी आहेत. विलगीकरणासाठी ठेवण्यात आलेल्या काही नागरिकांनी तक्रारी केल्याचं माझ्यापर्यंत आलं आहे. त्यांना बघायला डॉक्टर येत नाही, असं काहीचं म्हणणं आहे. पण, याची मी चौकशी केली. या माहितीत अजिबात तथ्य नाही. पंरतु अशी चुकीची माहिती दिली जात असेल, तर प्रशासनाकडे चौकशी करावी. वेळोवेळी पूर्ण माहिती दिली जाईल. माध्यमांनी याची खबरदारी घ्यावी. या रुग्णांना अर्ध्या अर्ध्या तासाला तपासण्याची गरज नाही. त्यामुळे रुग्णांकडून देण्यात आलेली माहिती खरी नाही. ज्या जिल्ह्यात परदेशातून आलेले नागरिक आहेत. त्यांना विलग राहण्याचं सांगण्यात आलं आहे. शक्य तेवढा घरच्या लोकांशी संपर्क टाळण्याचं सांगण्यात आलं आहे,' अशी माहिती पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.


कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित

कोरोना व्हायरस जगातील 111 देशांमध्ये फोफावला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात चार हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरसला जगात महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसंच कोरोनाविरोधात संपूर्ण जगाने आता एकजूट होऊन लढावं, असं आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे.


परदेशातून येणाऱ्यांचे व्हिसा रद्द

परदेशातून भारतात येणाऱ्यांचे व्हिसा 15 एप्रिलपर्यंत सस्पेंड करण्यात आले आहेत. यामधून राजनीतीज्ञ आणि यूएन कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलं आहे. चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमधून येणारे भारतीय 14 दिवसांसाठी देखरेखीखाली असतील.


कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आर्थिक आयोगने 13 मार्च रोजी होणारी राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबतची बैठक रद्द केली आहे. एअर इंडियाने इटलीला जाणारी विमानं 28 मार्च आणि दक्षिण कोरियाला जाणारी विमानं 25 मार्चपर्यंत रद्द केली आहेत. इटलीमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 827 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 12462 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.


संबंधित बातम्या : 


#CoronaVirus | कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार, शनिवारीच अधिवेशनाचा समारोप


Corona Virus | असंवेदनशीलतेचा कळस, कोरोना पीडित रुग्णाच्या कुटुंबाला वाळीत टाकलं


IND Vs SA, Coronavirus | प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणार भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेतील सामने