एक्स्प्लोर

Pune Lok Sabha : कुणी काहीही दावा केला तरी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार - बाळासाहेब थोरात

Pune Loksabha Bypoll : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

Pune Loksabha Bypoll : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या जागेवरून आता महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे दिसतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुणे लोकसभा निवडणुकीवर दावा केला होता. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार असल्याचे स्पष्ट सांगिलेय. कुणी काहीही दावा केला तरी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार, असे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी आज सांगितले.  

पुणे लोकसभेत कोणत्या पक्षाची ताकद जास्त ?

आमची मविआ आहे, यात ताकद जास्त कोणाची यापेक्षा पारंपरिक पद्धतीने कोण निवडणूक लढत आलं. चर्चा होत असते आम्ही बैठकीत निर्णय घेऊ. आता कसबा विधानसभा आम्ही लढलो सर्वांचं सहकार्य झालंच, हे आम्ही नाकारत नाही. तसंच ही लोकसभा आम्ही लढवू आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. अशीच विनंती आमची राहील.

अजित पवार म्हणतात पुणे लोकसभा राष्ट्रवादीचं लढवेल, थोरात काय म्हणाले ? -

पुणे लोकसभा राष्ट्रवादीचं लढवेल, असा दावा अजित पवार यांनी केला होता. याबाबत थोरात यांना प्रश्न विचारला... त्यावर ते म्हणाले की, ही चर्चा होते, अगदी बैठकीत ही हा मुद्दा होईल. मात्र पारंपरिक पद्धतीने जो लढत आलाय, त्यानेच तो लढवावा आणि त्यावर आम्ही ठाम राहू. आत्ता ही 48 लोकसभेबाबत ही तीच चर्चा आहे. पारंपरिक पद्धतीनेच लढली जाईल.

मावळ लोकसभा काँग्रेस लढणार? 

तसं काही नाही, आम्ही 48 लोकसभेबाबत चर्चा करतोय. त्यात काही कार्यकर्ते म्हणतात ही जागा काँग्रेसला घ्या, तो कार्यकर्ता मीडियाला येऊन सांगतो आणि तशा बातम्या चालतात. मात्र तूर्तास त्या चर्चांमध्ये तथ्य नाही. लवकरच एकत्र बसून जागा वाटप होईल, असे थोरात म्हणाले. 

 पालिकांपेक्षा लोकसभा निवडणूक महत्वाची -

लोकसभा निवडणूक ही येत्या काळात खूप महत्त्वाची राहणार आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूकही येत आहे. तत्पूर्वी कदाचित महापालिकेची निवडणूक लागेल. मात्र लोकसभाच महत्वाची आहे ही वस्तुस्थिती आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. 

नितेश राणेंचे शरद पवार वक्तव्य, थोरात काय म्हणाले ?

राजकारणाचा स्तर इतका खालावला आहे की आम्ही टीव्ही पाहणं बंद करतोय. कोणीतरी काही बोलावं आणि ते संपूर्ण जनतेने पाहावं. आता हे जर आचारसंहिता पाळत नसतील तर किमान चॅनेल ने तरी आपली एक आचारसंहिता बनवावी. अशी उलट माझी मागणी आहे. तुम्हीच अशा बातम्या दाखवू नयेत. कोणी कोणाबद्दल काय बोलावं याचं काही तारतम्य बाळगायला हवं. संसदेतील माझ्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीतील हा सर्वात खालावलेला काळ आहे, थोरात म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
Pune Rain : पुणे जिल्ह्यात मुसळधार! खडकवासलासह तीन धरणं भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे जिल्ह्यात मुसळधार! खडकवासलासह तीन धरणं भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Ujani Helicopter Fish : घरातील फिशटँकमधील माशाने डोकेदुखी वाढवली, जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोक्याची घंटा, उजनी परिसर टेन्शनमध्ये!
घरातील फिशटँकमधील माशाने डोकेदुखी वाढवली, जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोक्याची घंटा, उजनी परिसर टेन्शनमध्ये!
Khadakwasla Dam Water Discharge : पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून आज 43,571 क्युसेक्सने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून आज 43,571 क्युसेक्सने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Embed widget