एक्स्प्लोर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज पुणे दौरा, कोरोनाविषयक उपयाययोजनांचा आढावा घेणार

मुख्यमंत्री आज सकाळी नऊ वाजता पुणे दौऱ्याला निघतील. राज्यावर कोरोनाचं संकट असूनही मुख्यमंत्री मातोश्रीचा उंबरठा ओलांडत नसल्याची टीका विरोधकांकडून वारंवार होत आहे. शिवाय पुण्यावर अन्याय होत असल्याची टीकाही विरोधक करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे.

मुंबई : पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुण्याचा दौरा करणार आहेत. पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री आज दिवसभर पुण्यात असतील.

राज्यावर कोरोनाचं संकट असूनही मुख्यमंत्री मातोश्रीचा उंबरठा ओलांडत नसल्याची टीका विरोधकांकडून वारंवार होत आहे. शिवाय पुण्यावर अन्याय होत असल्याची टीकाही विरोधक करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे.

मुख्यमंत्री आज सकाळी नऊ वाजता पुणे दौऱ्याला निघतील. कोरोनाविषयक उपयाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आज दिवसभर पुण्यात असतील. यावेळी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत कोरोनाविषयक बैठकाही घेणार आहेत.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी 12.15 वाजता त्यांची कोरोना साथीसंदर्भात सर्व लोकप्रतिनिधीसमवेत बैठक होईल. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता त्यांची याच संदर्भात सर्व प्रशासकीय यंत्रणांसमवेत बैठक होईल. या बैठकांना त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, मुख्य सचिव संजय कुमार तसंच इतर लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारीही उपस्थित असतील. मग संध्याकाळी पाच वाजता ते मुंबईकडे रवाना होतील.

सरकारकडून पुण्यावर अन्याय : देवेंद्र फडणवीस राज्य सरकार पुण्यावर अन्याय करत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केली होती. "हे सरकार मुंबईकडे जितकं लक्ष देतं तितकं पुण्याकडे देत नाही. पुण्यावर अन्याय केला जात आहे. पुण्यात क्वॉरन्टाईन सेंटर, आयसीयू बेड वाढवण्याची गरज आहे. पण पुणे, पिंपरी महापालिकेला एकाही नव्या पैशांचं अनुदान राज्य सरकारने दिलेलं नाही," असं फडणवीस म्हणाले होते.

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 75 हजारांहून जास्त रुग्ण आढळले आहेत. तरीही मुख्यमंत्री केवळ मुंबईतील परिस्थिती कशी नियंत्रणात आणली याबद्दल पाठ थोपवून घेत आहेत अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा राजकीय दृष्टीकोनातूनही लक्षवेधी ठरणार आहे. यावेळी मुख्यमंत्री विरोधकांना उत्तर देणार का, याचीही उत्सुकता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
Kho Kho Association : खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप
खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
Embed widget