एक्स्प्लोर

Pune News : टिपू सुलतानचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही; टिपू सुलतान विरोधात पुण्यातील भाजप कार्यकर्ते आक्रमक

टिपू सुलतानचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही, असं म्हणत भाजपने टिपू सुलतानच्या जयंतीला विरोध केला आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना पत्र देत धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना शिक्षा करण्याची मागणी केली.

पुणे : टिपू सुलतान (Tipu Sultan) विरोधात पुण्यातील भाजप कार्यकर्ते (BJP)आक्रमक झाले आहेत. टिपू सुलतानचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही, असं म्हणत टिपू सुलतानच्या जयंतीला विरोध केला आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन तातडीने अशी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना शिक्षा करण्याची मागणी केली. पोलिसांनी वेळीच असल्या प्रवृत्तीला आळा घालावा अन्यथा या प्रवृत्तीचा बिमोड करण्यास आम्ही समर्थ आहोत, असा भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी इशारा दिला.

काय म्हणाले धीरज घाटे?

ज्याने असंख्य हिंदूंची कत्तल केली ज्याने अनेक लोकांचे बळजबरी धर्मांतर करून त्यांचा अमानुष छळ केला अशा धर्मांध विकृती असलेल्या टिपू सुलतान ची जयंती महाराष्ट्रात साजरी केली जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही त्याचे उदात्तीकरण होऊ देणार नाही पोलिसांनी वेळीच असल्या प्रवृत्तीला आळा घालावा अन्यथा या प्रवृत्तीचा बिमोड करण्यास आम्ही समर्थ आहोत असा इशारा भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिला. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन तातडीने अशी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना शासन करण्याची मागणी केली.

नुकतीच पुण्यात टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यात आली. पुढे बोलताना घाटे यांनी पोलिसांनी या बाबत गंभीरतेने दखल घेऊन या लोकांचा शोध घेऊन कारवाई करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी अशी मागणी केली. या शिष्टमंडळामध्ये घाटे यांच्यासह सरचिटणीस पुनीत जोशी, राघवेंद्र मानकर ,राजेंद्र शिळीमकर ,राहुल भंडारे ,वर्षा तापकीर, महेश पुंडे  यांचा समावेश होता. 

पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्यासाठी काही जणांकडून जाणीवपूर्वक अशी कृत्ये केली जात असल्याचे दिसते. केवळ धर्म वेगळा होता म्हणून ज्याने येथील नागरिकांवर अत्याचार केले. त्याच्या उदात्तीकरणाचा प्रकार पुणे शहर भारतीय जनता पार्टी कधीच खपवून घेणार नाही. आपण या संपूर्ण प्रकाराचा तपास करावा आणि यामागे नक्की कोण लोक आहेत, याचा शोध घ्यावा, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत. पुण्यातील शांतता बिघडेल, अशा गोष्टींना अजिबात थारा दिला जाऊ नये. पोलिसांनी यामध्ये वेळीच हस्तक्षेप करावा, अशी आमची मागणी आहे. आपण या प्रकरणात लक्ष घालून संबंधित कनिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक आदेश द्यावेत, अशी विनंती आम्ही करतो, असं त्यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Atal Setu Mumbai Pune: मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 90 मिनिटांत! नवी मुंबई विमानतळ प्रवासही सुसाट, अटल सेतूला फास्ट कनेक्टिव्हिटी
मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 90 मिनिटांत! नवी मुंबई विमानतळ प्रवासही सुसाट, अटल सेतूला फास्ट कनेक्टिव्हिटी
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा वणवा, काल पदाधिकाऱ्याचा राजीनामा, आज दुखावलेल्या कार्यकर्त्याने साथ सोडली, म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा वणवा, काल पदाधिकाऱ्याचा राजीनामा, आज दुखावलेल्या कार्यकर्त्याने साथ सोडली, म्हणाला...
प्रिय दादा! प्रत्येक क्षणी तुझी उणीव जाणवते, आठवणी कायम आमच्या हृदयात राहतील, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट 
प्रिय दादा! प्रत्येक क्षणी तुझी उणीव जाणवते, आठवणी कायम आमच्या हृदयात राहतील, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट 
Pune Court Firing News: पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्लाची व्याप्ती वाढली; कर्नाटक गाठण्याची तयारीत असलेल्या आणखी तिघांना अटक; आरोपींची संख्या अकरावर
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्लाची व्याप्ती वाढली; कर्नाटक गाठण्याची तयारीत असलेल्या आणखी तिघांना अटक; आरोपींची संख्या अकरावर

व्हिडीओ

Rahul Gandhi Fail To Convince DMK : डिलिमिटेशनचा 'खेळ', मिशन चेन्नई फेल! | Special Report ABP Majha
Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation : कोणत्याही ठोस आश्वासनाशिवाय संपली इंडिया आघाडीची बैठक, शरद पवारांनी नेत्यांची मत जाणून घेतली, सूत्रांची माहिती
शरद पवार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक ठोस आश्वासनाशिवाय संपली, दिल्लीत सुप्रिया सुळेंची खासदारांसोबत बैठक
Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Parth Pawar : तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
तुमचा हेतू कितीही चांगला असू द्या पण साप हा साप असतो, पार्थ पवारांच्या इन्स्टाग्राम स्टेटसचा व्हिडिओ चर्चेत
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
Embed widget