एक्स्प्लोर

Pune Potholes News: खचलेले रस्ते अन् खड्डे तातडीने दुरुस्त करा; खड्ड्यांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील अॅक्शन मोडवर

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील पत्र लिहिले असून तातडीने रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Pune Potholes News: गेल्या आठवड्याभरात पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे तर काही ठिकाणी रस्ते खचले असल्याचे दिसून येत आहे. त्यासंदर्भात पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील पत्र लिहिले असून तातडीने रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे कोथरुड मतदार संघातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक, भेलकेनगर चौक, राहुलनगर, नवीन शिवणे, कर्वेरोड, आशिष गार्डन चौक, गुजराथ कॉलनी परिसर, नळस्टॉप चौक (एसएनडीटी चौक- कॅनॉल रोड), पौड फाटा, सदानंद हॉटेलसमोरील बाजू, चांदनी चौक आयटी पार्क समोर, कोथरुड डेपो, मातोश्री वृद्धाश्रमजवळील रस्ता, पौड रोड आनंदनगरसमोरील बाजू, यांसह विविध भागांतील रस्ते मोठ्या प्रमाणात खचले आहेत. याशिवाय काही ठिकाणी सिमेंट रस्त्या लागतचे डांबरी रस्ते खचून असमान झाले आहेत.

त्यामुळे सदर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अन्यथा सदर रस्त्यांवर एखादा मोठा अपघात होऊन, जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तरी संभाव्य शक्यताची भीषणता लक्षात घेऊन सदर भागातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.

पुण्यातील खड्ड्यांविरोधात पुणे शहरात प्रत्येक पक्षांकडून रोज मोठी आंदोलनं सुरु आहेत. राष्ट्रवादी पक्षाने तर खड्ड्यात मासे सोडत आंदोलन केलं होतं. तर मनसेने खड्ड्यांची पुजा करुन रांगोळी घालून आंदोलन केलं. गेले पाच वर्ष पुण्यात भाजपची सत्ता होती. त्यामुळे खड्ड्यांबाबतचं सगळं खापर भाजपवर फोडलं जात आहे. त्यात 90 टक्के खड्डे बुजवल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता. मात्र हा दावा खोटा असल्याचं पुणे शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या पत्रामुळे खड्डेमुक्त पुणे होणार का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Santosh Pandit Marathi News: तुम्हाला एक आतली गोष्ट बोलतो...; कारागृहातून बाहेर येताच संतोष पंडित यांनी सांगितलं धक्कादायक वास्तव
तुम्हाला एक आतली गोष्ट बोलतो...; कारागृहातून बाहेर येताच संतोष पंडित यांनी सांगितलं धक्कादायक वास्तव
Pune FDA Raid: पुण्यातील द न्यू पूना क्लबवर एफडीएची मोठी कारवाई; क्लबच्या स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा, साचलेले पाणी अन् फ्रीजजवळ अस्वच्छ शौचालय दिसलं
पुण्यातील द न्यू पूना क्लबवर एफडीएची मोठी कारवाई; क्लबच्या स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा, साचलेले पाणी अन् फ्रीजजवळ अस्वच्छ शौचालय दिसलं
Pune Santosh Pandit Marathi News: पुण्यातील यू-ट्युबर संतोष पंडित यांची जामीनावर सुटका; कारागृहातून बाहेर येताच म्हणाले...
पुण्यातील यू-ट्युबर संतोष पंडित यांची जामीनावर सुटका; कारागृहातून बाहेर येताच म्हणाले...
Pune Crime News: लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना

व्हिडीओ

Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report
Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Mamata Banerjee: नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Mahendra Dalvi : बाप्पाचं दर्शन घेणं चुकीचं नाही, आमचा संघर्ष, त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंची भूमिका चुकली, महेंद्र दळवींची गोगावले-तटकरे भेटीवरुन नाराजी
तटकरेंकडे सगळेच लोक संशयानं बघतात, भरतशेठनं त्यांच्या घरी जाणं टाळलं पाहिजे होतं, महेंद्र दळवींची नाराजी समोर
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Eknath Shinde Mobile: एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
Pune Crime News: लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
Embed widget