पुणे पोर्शे कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन आय टी अभियंत्यांचा मृत्यू झाला. रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली.  या अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाला जमावान चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं. हा चालक  पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या मुलगा आहे. तो सतरा वर्षाचा आहे. 


महत्वाचं म्हणजे अग्रवाल यांचा मुलगा चालवत असलेल्या पोर्शे कारला नंबर प्लेट नव्हती.  या अपघातात अनिश अवधिया तरुण आणि आय टी अश्विनी कोष्टा ही तरुणी जागेवरच मृत्युमुखी पडले आहेत.  हे दोघेही पुण्यातील एका आय टी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होते. या अपघातानंतर पुण्यातील पब आणि बारना रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.  त्याचबरोबर पोर्शे सारखी महागडी कार पुण्याच्या रस्त्यांवर नंबर प्लेट शिवाय कशी धावू शकते हा प्रश्नह विचारला जात आहे. 


कायद्याची अन् नियमांची ऐशीतैशी..


पुण्यातील रस्त्यांवर अनेक आलिशान महागड्या कार बघायला मिळतात. प्रत्येकच गाडीला नंबर प्लेट अनिवार्य आहे. मात्र या अग्रवालच्या गाडीला नंबर प्लेट नव्हती. त्यात तो अल्पवयीन आहे. असं असूनही पुण्याच्या रहदारीच्या रस्त्यावर भरधाव वेगाने गाडी चालवत होता. निष्काळजीपणाने, भरधाव वेगाने, बेदरकारपणे गाडी चालवल्याने नियंत्रण सुटलं आणि थेट दोन तरुणांना चिरडलं. गाडीला नंबर प्लेट नाही, परवाना नाही तरीही भरधाव वेगाने गाडी चालवत त्याने वाहतुकीचे सगळे नियम धाब्यावर मारले. त्याच्याविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पुण्यात रात्री उशिरापर्यंत पब सुरुच!


पुण्यात रात्री उशिरापर्यंत पब सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रात्री दीड वाजेपर्तंय पुण्यातील पब सुरु राहतात. मात्र त्यानंतरही रात्रीचा धिंगाणा सुरुच असल्याचं दिसत आहे. रात्रीचे पब सुरु असल्याने अनेक तरुण तरुणी मद्यप्राशन करुन गाड्या चालवतात. रस्त्यावर अनेकदा धिंगाणादेखील घालतात. त्यात भरधाव गाड्या चावलतात. यात अनेकदा नाहक जणांचा जीव गेल्याच्या घटना घडला आहे. पब आणि तरुण-तरुणी पोलीस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचं चित्र दिसून येत आहे. 


इतर महत्वाची बातमी-


पुण्यात भरधाव वेगाचे दोन बळी; पब फक्त नावालाच बंद, रात्रीचा धिंगाणा सुरुच, आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली!


पुण्यात भरधाव सुपरकारने पार्टी करुन परत येणाऱ्या दोघांना चिरडलं; मध्यरात्रीच्या घटनेनं थरकाप