पुणे : पुण्यातील कल्याणी नगर परिसरात पोर्शे गाडीने दोन तरुणांना  (Pune Accident)चिरडलं आहे. या अपघातात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात एका मुलाचा आणि एका मुलीचा समावेश आहे. मध्यरात्री (Pune Crime News) पार्टी करून जात असलेल्या तरुणाने भरधाव गाडी चालवत दोघांचा जणांचा जीव घेतला आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकिब रमजान मुल्ला याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कारचालक असलेल्या 17 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


हा सगळा प्रकार शनिवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास कल्याणीनगर जवळ घडला. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रांच्या सोबत बॉलर हॉटेलमध्ये पार्टी करुन घरी परत जात होते. कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर ग्रे कलरच्या गाडीने दोन्ही बाजूस नंबरप्लेट नसलेल्या कार चालकाने त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडी हयगयीने, निष्काळजीपणाने, भरधाव वेगाने, बेदरकारपणे अनिस अवधिया याच्या दुचाकीला (एम.एच. 14 सी क्यु 3622) हिला पाठीमागून जोरात धडक दिली.या अपघातात अनिस अवधिया व मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. पोलीस पुढील तपास करत आहेत. 


मध्यरात्री घटलेला हा प्रकार पाहून कल्याणी नगर परिसरातील अनेक आजूबाजुला असलेले नागरिक गोळा झाले आणि सतरा वर्षीय भरधाव कारचालक असलेल्या मुलाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. कारचालक पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र त्याला नागरिकांनी भररस्त्यात अडवून धरलं आणि रस्त्यातच त्याला मारायला सुरुवात केली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा सतरा वर्षीय मुलगा पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीचा मुलगा असल्याची चर्चा आहे. मात्र यासंदर्भात अजून अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नाही आहे. 


दोघांच्या मृत्यूला जबाबदार कोण?


मृत्यू झालेला अनिस दोन दिवसांपूर्वीच बाहेरदेशातून पुण्यात परतला होता. पार्टीसाठी मैत्रीसोबत गेला आणि त्याचा अपघातात मृत्यू झाला. भरधाव चालक हा फक्त सतरा वर्षांचा आहे. त्यात परवाना नसताना तो पोर्शे गाडी भरधाव वेगाने चालवत होता. याच गाडीच्या धडकेत दोघांचा नाहक जीव गेला. पोर्शेसारखी महागड्या गाडीचं यात मोठं नुकसान झालं आहे. त्यात अशा श्रीमंतांच्या मुलांच्या या अशा भरधाव गाडीच्या वेगाने अजून किती जणांचा जीव घेणार आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट