पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती आणि पुण्याच्या निवडणुकीच्या (Ajit Pawar) मतदानानंतर पुन्हा एकदा बॅक टू वर्क आल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी आज बारामतीचा दौरा आखला आहे. बारामतीतील विकास कामांची पाहणी करत आहे. नेहमी प्रमाणे पहाटेच त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. विकास कामाच्या पाहणीनंतर  अजित पवारांनी  कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी संवाद  साधला त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. 


निवडणुकीनंतर एक अजित पवाराच तुमची चौकशी करायला येणार आहे. तेव्हा तुम्ही आणि मीच राहू. निवडणुकीनंतर कोणीही तुमची विचारपूस करायला येणार नाहीत, असं सुनेत्रा पवारांच्या प्रचारादरम्यान अजित पवार वारंवार सांगत होते. त्यानंतर आज अजित पवारांनी थेट लोकांची भेट घेतली विकास कामांची पाहणी केली आणि त्यांनी दिलेला शब्द पाळला. सुनेत्रा पवारांच्या प्रचार करण्यासाठी अजित पवारांनी प्रचंड मेहनत केली. त्यांच्या विरोधात अख्ख पवार कुटुंब उभं ठाकलं होतं. सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी कुटुंबातील सगळे सदस्य सक्रिय झाले होते. तरीही अजित पवार न डगमगता निवडणुकीचा प्रचार केला आणि सांगता सभेत तुफान फटकेबाजी केली होती. 


अचानक गायब झाले अन् थेट मोदींच्या सभेत अवतरले...



उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती आणि पुण्याच्या निवडणुकीच्या मतदानानंतर अजित पवार काही दिवस गायब झाल्याचं बोललं गेलं. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील रोड शो मध्येही अजित पवार दिसले नाहीत. त्यानंतर ते गायब झाल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच अजित पवार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील सभेत प्रकटले आणि त्यांच्या गायब होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. अजित पवार यांचं अचानक गायब होणं अजित पवारांसाठी नवीन नाही. अजित दादा जेव्हा जेव्हा गायब झाले तेव्हा तेव्हा राज्यात राजकीय भूकंप झाले. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायुतीच्या मुंबईतील सभेत  अजितदादा दिसले नाहीत आणि त्यांच्याबाबतच्या चर्चाना पुन्हा एकदा सुरुवात झाली होती . मात्र तब्बेत बरी नसल्यानं अजितदादा आराम करत असल्यानं ते सभेला आले नाहीत, असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर मोदींच्या सभेला ते असतील असंही सांगितलं होतं. त्यानंतर मोदींच्या सभेला ते उपस्थित होते. आता अजित पवार पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. ते बारामतीत दौरे आखत आहेत. लोकांची चौकशी करताना दिसत आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट