एक्स्प्लोर
पुणे : बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : बोअरवेलमधून बाहेर काढलेल्या 4 वर्षीय सुनील मोरे या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 31 तासांनंतर सुनीलला बाहेर काढण्यात एनडीआरएफच्य जवानांना यश आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान सुनीलने अखेरचा श्वास घेतला. शिरुरमधील मांडवगण फराटा येथील जुना मळा येथे 25 फूट बोअरवेलमध्ये सुनील हरिदास मोरे हा 4 वर्षांचा चिमुकला खेळत असताना बोअरवेलमध्ये पडल्याची घटना काल दुपारी घडली होती. तर आज एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन सुनीलला बोअरवेलमधून बाहेर काढलं होतं. मात्र, आज उपचारादरम्यान सुनीलचा मृत्यू झाला. 31 तासांपेक्षा जास्त सुनील या बोअरवेलमध्ये पडला असल्याने त्याच्या हालचाली मंदावल्या होत्या. भुकेमुळे आणि उष्णतेमुळे त्याच्या शरीरातील पाणी कमी झालं होतं. काळा पाषाण लागल्याने त्यातून सुनीलला कसलीही इजा न होता बाहेर काढणे आव्हान बनले होते. मात्र, तरीही एनडीआरएफच्या जवानांनी सुनीलला बाहेर काढलं. मात्र, उपचारादरम्यान चिमुरड्या सुनीलने अखेरचा श्वास घेतला.
Before You Go
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय






















