एक्स्प्लोर

दीपक मानकरांच्या याचिकेवर सुनावणीस दुसऱ्या खंडपीठाचाही नकार

पुण्यातील नगरसेवक दीपक मानकरांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत. मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयातील आणखी एका खंडपीठानं नकार दिला आहे.

मुंबई : पुण्यातील नगरसेवक दीपक मानकरांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत. मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयातील आणखी एका खंडपीठानं नकार दिला आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी घेण्यास असमर्थता दाखवली. दीपक मानकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सोमवारी नकार दिला होता. मानकर यांच्या जामीन अर्जावर सोमवारी न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मात्र या याचिकेवर सुनावणी घेण्यास या खंडपीठाने असमर्थता दर्शवली. त्यामुळे मानकर यांना दुसऱ्या खंडपीठापुढे ही याचिका सादर करावी लागली होती. आता त्याही खंडपीठाने सुनावणीस नकार दिला आहे. मानकर यांना आता पुन्हा नव्या खंडपीठासमोर याचिका सादर करावी लागेल. काही दिवसांपूर्वी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात दिपक मानकर यांचं नाव चर्चेत आलं होतं. जितेंद्र जगताप यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पाच जणांच्या नावाचा उल्लेख करत त्यांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं होतं. या पाच जणांत दिपक मानकर यांच्याही नावाचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटकसत्र सुरू करताच मानकर यांनी हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. कर्मचाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये मानकरचं नाव मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या जितेंद्र जगताप नावाच्या व्यक्तीने 2 जूनला घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी जितेंद्र जगताप यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. रास्ता पेठेतील एका जागेच्या वादातून हा प्रकार घडला. जितेंद्र जगताप हा गेली अनेक वर्ष दीपक मानकरांचे जमिनीचे व्यवहार पाहात होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून समर्थ पोलिस स्टेशनसमोर असलेल्या जागेवरुन दोघांमध्ये वाद सुरु होता. त्यासाठी मानकर, कर्नाटकी, भोळे यांच्या अनेकवेळा बैठकाही झाल्या होत्या. जागेचा ताबा सोडण्यासाठी मानकर जितेंद्र जगतापवर दबाव टाकत होते. दरम्यान जितेंद्र जगताप हा खंडणी उकळण्यासाठी आत्महत्येची धमकी देत होता आणि त्याबद्दलचा अर्ज आपण 1 जूनलाच पोलिस आयुक्तालयात दिल्याचं म्हटलं आहे. दीपक मानकर यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिली आहे. काँग्रेसमध्ये असताना नातू वाड्यातील जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना अटक झाली होती. अनेक दिवस येरवडा कारागृहात जावं लागलं होतं. संबंधित बातम्या : पुण्यातील नगरसेवक दिपक मानकर अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात जितेंद्र जगतापच्या सुसाईड नोटमध्ये दीपक मानकरांचं नाव पुणे : जितेंद्र जगताप यांचा लहान भाऊ आणि मुलासोबत बातचीत 

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
Rohit Pawar and Devendra Fadnavis: रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
Pune MPSC Protest: MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
MPSC च्या आंदोलनस्थळी येताच घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
माझ्याजवळ मोदींची कुंडली, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत सोडणार नाही, देशाचा युवक आता थांबणार नाही; राहुल गांधींनी आरपारच्या लढाईसाठी रणशिंग फुंकलं!
Pune MPSC Protest: MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
MPSC आंदोलन स्थगित, पण ऋषिकेश गांगुर्डे नाराज; एक दिवस आधीच अहिल्यानगरला परतले, आता सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाले, 2 दिवसांनी सगळं बोलणार!
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Rohit Pawar and Devendra Fadnavis: रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
रोहित पवारांचं भविष्य फक्त तीन जण घडवू शकतात; देवाभाऊ... देवाभाऊ.. देवाभाऊ! नितेश राणेंचं वक्तव्य
Embed widget