एक्स्प्लोर

Pune Chandani Chowk : दसऱ्यासाठी गावी जायचं नियोजन करत असाल तर आधी ही बातमी पाहा; मुंबई, पुणेकरांनी या मार्गाने प्रवास करावा

बावधन, हिंजवडी, देहूरोड, वाकड वाहतूक विभागाअंतर्गत मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही उर्से टोल नाक्यापासून चांदणी चौकाकडे येण्यास बंदी करण्यात करण्यात आली आहे.

Pune Chandani Chowk : पुण्यातील  बावधन वाहतूक विभागाअंतर्गत मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल पाडल्यानंतर त्या ठिकाणच्या रस्त्याच्या बाजूचे खडक फोडण्याचे काम सुरु असल्यामुळे 4 ऑक्टोबर रोजी रात्री 11:30 पासून 5 ऑक्टोबर रोजी पहाटे 1:30 वाजेपर्यंत वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
  
असे असतील पर्यायी मार्ग-
बावधन, हिंजवडी, देहूरोड, वाकड वाहतूक विभागाअंतर्गत मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही उर्से टोल नाक्यापासून चांदणी चौकाकडे येण्यास बंदी करण्यात करण्यात आली आहे. मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सूस खिंड येथून चांदणी चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. 

मुंबईकडून पुणे साताऱ्याकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनांकरता पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मुंबईकडून येणारी सर्व प्रकारची वाहने उर्से टोलनाका येथून सेंट्रल चौक मार्गे जुन्या मुंबई-पुणे हायवेमार्गे भक्ती शक्ती चौक, नाशिक फाटा पुणे मार्गे जातील.

वाकड चौकातून डावीकडे वळून राजीव गांधी पुलावरुन विद्यापीठ मार्गे जाता येईल. भुमकर चौकातून डावीकडे वळून डांगे चौक मार्गे रक्षक चौक, राजीव गांधी पुलावरुन, औंध, शिवाजीनगर मार्गे, किवळे चौकातून रावेत, डांगे चौक मार्गे रक्षक चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध, शिवाजीनगर मार्गे जाता येणार आहे. राधा चौकातून डावीकडे वळून बाणेर रोडने पुणे विद्यापीठ चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल, असे पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपआयुक्त आंनद भोईटे यांनी कळवले आहे.

कालच्या दिवसाच्या ब्लॉकमुळे त्रास
काल देखील एका बाजूची टेकडी फोडण्यासाठी भर दुपारी ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र पूर्वसूचना न देता हा ब्लॉक घेण्यात आला असल्याचं नागरिकांचं म्हणणं होतं. त्यामुळे अनेक नागरिकांना या ब्लॉकमुळे त्रास सहन करावा लागला होता. यात काही शाळेच्या बस देखील अडकल्या होत्या. दीड ते दोन तास बस जागेवर उभी असल्याने विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रासही झाला. शालेय बस असल्याने मुलांनी रडारड केली होती. मुलांची शाळेतून घरी येण्याची वेळ चुकल्याने अनेक पालकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. पालकांनी अनेकांकडून फोनवरुन माहिती घेतली त्यानंतर पालकांचा जीव भांड्यात पडला. मात्र काहीही न सांगता अशाप्रकारचा ब्लॉक घेतल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे आज हा ब्लॉक दिवसा न घेता रात्री घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
Embed widget