एक्स्प्लोर

तक्रार देऊ नये यासाठी भाजप आमदाराचे तक्रारदारापुढे लोटांगण

एका केबल कंपनीकडून पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितल्याबद्दल आमदार योगेश टिळेकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. मात्र तो गुन्हा नोंद करणाऱ्या पोलीस निरीक्षकाची तडफडकी बदली करण्यात आली. त्यामुळे विरोधी पक्षांनी त्यावर रान उठवलं. आता खुद्द आमदार टिळेकरच त्यांच्याविरुद्ध तक्रार देणाऱ्याचे पाय धरत असल्याचा व्हिडीओ समोर आल्याने खंडणीचं हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय.

पुणे: खंडणीचा गुन्हा असलेले भाजपचे पुण्यातील हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांनी तक्रार देऊ नये यासाठी तक्रारदार रवींद्र बऱ्हाटे यांच्यापुढे लोटांगण घालत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. एका केबल कंपनीकडून पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितल्याबद्दल आमदार योगेश टिळेकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. मात्र तो गुन्हा नोंद करणाऱ्या पोलीस निरीक्षकाची तडफडकी बदली करण्यात आली. त्यामुळे विरोधी पक्षांनी त्यावर रान उठवलं. आता खुद्द आमदार टिळेकरच त्यांच्याविरुद्ध तक्रार देणाऱ्याचे पाय धरत असल्याचा व्हिडीओ समोर आल्याने खंडणीचं हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. बऱ्हाटे यांचे असे पाय धरूनही टिळेकर यांच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. उलट तक्रारदाराचे पाय धरत असल्याचा हा व्हिडीओ समोर आल्याने टिळेकर यांच्यावर करण्यात आलेल्या खंडणीच्या आरोपांना आणखीनच बळ मिळालंय. हडपसर भागात फायबर ऑप्टिक टाकण्यासाठी आमदार टिळेकर यांनी व्हिजन टेलिकम्युनिकेशन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा टिळेकर यांच्यावर आरोप आहे. व्हिजन इन्फ्रा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राहुल गणगोटे आणि टिळेकर यांच्यातील मोबाईल कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर कोंढवा पोलिसांनी आमदार टिळेकर यांच्यावर 12 ऑक्टोबरला खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र त्याआधी अनेक दिवस आमदार टिळेकर त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली जाऊ नये यासाठी प्रयत्न करत होते. त्याचाच भाग म्हणून आमदार टिळेकर नऊ सप्टेंबरला रवींद्र बऱ्हाटे यांना भेटायला एका हॉटेलमध्ये गेले. हॉटेलच्या लॉबीमध्ये आमदार टिळेकर तक्रारदार रवींद्र बऱ्हाटे यांना काहीतरी समजावून सांगताना आणि त्यानंतर अचानक त्यांचे पाय धरताना दिसतायत. आमदार टिळेकर यांनी देखील ते बऱ्हाटे यांना भेटल्याचा आणि बऱ्हाटे यांचे पाय धरल्याचं मान्य केलंय. मात्र आपण बऱ्हाटे यांना समजावण्यासाठी गेलो होतो असा आमदार टिळेकर यांचा दावा आहे.बऱ्हाटे हे व्हिजन टेलिकम्युनिकेशन इन्फ्रा या कंपनीचे एरिया मॅनेजर म्हणून काम करतात. टिळेकर यांनी पाय धरल्यानंतरही बऱ्हाटे यांनी टिळेकरांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आणि त्यांच्याकडे असलेले पुरावेही पोलिसांकडे सोपवलेत. 12ऑक्टोबरला आमदार टिळेकरांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर गुन्हा नोंद करणारे कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. गायकवाड यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे त्यांना निरोप देताना भावुक झालेल्या कोंढवा पोलीस स्टेशनच्या कार्मचाऱ्यांचा व्हिडिओही त्यानंतर चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र आता सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने आमदार टिळेकर यांच्याविरुद्धच्या आरोपांना बळ मिळाले आहे, असं रवींद्र बऱ्हाटे यांचं म्हणणं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: मफलर तर फक्त निमित्त, मागे 'बडा चेहरा'; रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनी अन् मुख्य सूत्रधाराबाबत मोठा गौप्यस्फोट, म्हणाले, '10 ऑक्टोबरला पुराव्यांसह...'
मफलर तर फक्त निमित्त, मागे 'बडा चेहरा'; रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनी अन् मुख्य सूत्रधाराबाबत मोठा गौप्यस्फोट, म्हणाले, '10 ऑक्टोबरला पुराव्यांसह...'
Nagpur: देशभरात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसचा एल्गार; नागपुरात निवडणूक आयुक्ताचा पुतळा जाळला; तर आंदोलनामागे शहरी नक्षलवाद्यांचे डोके, परिणय फुकेंचा आरोप
देशभरात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसचा एल्गार; नागपुरात निवडणूक आयुक्ताचा पुतळा जाळला; तर आंदोलनामागे शहरी नक्षलवाद्यांचे डोके, परिणय फुकेंचा आरोप
Pune Crime News: लग्नासाठी 45 लाख खर्च, 10 तोळे सोनं दिलं; तरीही चारचाकीसाठी 5 लाख आणण्याचा तगादा, पुण्यात IT इंजिनिअर विवाहितेने जीवन संपवलं
लग्नासाठी 45 लाख खर्च, 10 तोळे सोनं दिलं; तरीही चारचाकीसाठी 5 लाख आणण्याचा तगादा, पुण्यात IT इंजिनिअर विवाहितेने जीवन संपवलं
Vidyanand Bapat on Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कामाचं सगळीकडे कौतुक; विद्यानंद बापट म्हणाले, 'एखाद्या व्यक्तीने कितीही योगदान दिलं, तरी नागरिकांनी निष्ठा....'
तुकाराम मुंढेंच्या कामाचं सगळीकडे कौतुक; विद्यानंद बापट म्हणाले, 'एखाद्या व्यक्तीने कितीही योगदान दिलं, तरी नागरिकांनी निष्ठा....'

व्हिडीओ

Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Accident: वाहनाने बाजूने कट मारताच दुचाकी कठड्याला धडकली; जळगावात पुलावरून खाली पडून ज्योतिषाचा मृत्यू, मुलगी थोडक्यात बचावली
वाहनाने बाजूने कट मारताच दुचाकी कठड्याला धडकली; जळगावात पुलावरून खाली पडून ज्योतिषाचा मृत्यू, मुलगी थोडक्यात बचावली
Goregaon Toilet Death: रात्री शौचालयात गेले अन् बेशुद्ध पडले; 2 तरुणांच्या मृत्यूमागचं कारण FIR मधून समोर, पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
रात्री शौचालयात गेले अन् बेशुद्ध पडले; 2 तरुणांच्या मृत्यूमागचं कारण FIR मधून समोर, पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil: आंदोलनातील सहकाऱ्यांवर धडाधड कारवाई, अंतरवालीतील मंडप काढला, मनोज जरांगे सरकारवर संतापले, म्हणाले....
सहकाऱ्यांवर धडाधड कारवाई, अंतरवालीतील मंडप काढला, मनोज जरांगे सरकारवर संतापले, म्हणाले....
October Heat : सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटचा चटका; राज्यातील 4 जिल्ह्यांत उष्णतेचा पारा 35 अंशांहून जास्त; हवामान विभागाचा अंदाज काय?
सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटचा चटका; राज्यातील 4 जिल्ह्यांत उष्णतेचा पारा 35 अंशांहून जास्त; हवामान विभागाचा अंदाज काय?
Ramesh Mhatre : शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द, तीन दिवसांत शरण येण्याचे आदेश
शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द, तीन दिवसांत शरण येण्याचे आदेश
Ahilyanagar Crime News: कला केंद्रातील अंतर्गत वाद, मारहाण अन्..., निर्जन ठिकाणी नेऊन बेशुद्ध असलेल्या गर्भवती महिलेला जाळलं, पोलिसांनी 11 तासांचं CCTV तपासलं, अहिल्यानगरमधील हादरवणारी घटना
कला केंद्रातील अंतर्गत वाद, मारहाण अन्..., निर्जन ठिकाणी नेऊन बेशुद्ध असलेल्या गर्भवती महिलेला जाळलं, पोलिसांनी 11 तासांचं CCTV तपासलं, अहिल्यानगरमधील हादरवणारी घटना
Sanjay Raut and Tukaram Mundhe: माझा तुकाराम मुंढेंवर आक्षेप नाही, पण घोडा जेव्हा भरधाव धावतो तेव्हा...; संजय राऊत काय म्हणाले?
माझा तुकाराम मुंढेंवर आक्षेप नाही, पण घोडा जेव्हा भरधाव धावतो तेव्हा...; संजय राऊत काय म्हणाले?
Income Tax Department Raid: आयकर खात्याची बॉलीवूड इंडस्ट्रीतील बड्या अभिनेत्री-निर्मात्याच्या घरावर धाड, चित्रपटांच्या नावावर पैसे परदेशात पाठवल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
आयकर खात्याची बॉलीवूड इंडस्ट्रीतील बड्या अभिनेत्री-निर्मात्याच्या घरावर धाड, चित्रपटांच्या नावावर पैसे परदेशात पाठवल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
Embed widget