एक्स्प्लोर

Mukta Tilak : भाजप आमदार मुक्ता टिळक अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Mukta Tilak : भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्यावर आज (23 डिसेंबर) पुण्याच्या नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

Mukta Tilak : भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (mukta tilak) अनंतात विलीन झाल्या आहेत. पुण्याच्या नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर आज (23 डिसेंबर) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. मुक्ता टिळक यांचं काल (22डिसेंबर) दीर्घ आजाराने निधन झालं होतं. मागील पाच महिन्यापासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या अखेर त्यांची कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. 

मुक्ता टिळक यांचं पार्थिव सकाळी 9 ते 11 पुण्याच्या ऐतिहासिक केसरी वाड्यात दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, प्रवीण दरेकर उपस्थित होते. "मुक्ता टिळकांचं निधन आमच्यासाठी अत्यंत दुखाची बातमी आहे. पुण्याच्या सामाजिक राजकीय पटलावर संघर्षशील नेतृत्व म्हणून आपण त्यांचा अनुभव घेतला आहे. नगरसेवक, महापौर आणि आमदार म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. टिळकांचा वासरा त्यांनी चांगला निभावला. सामान्य कार्यकर्तीपासून मोठ्या पदावर स्वत:च्या मेहनतीने पोहचल्या. कल्पक आणि चांगल्या वक्त्या होत्या. त्या अर्ध्या वाटेत सोडून जातील असं वाटलं नव्हत. राज्यसभेच्या आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी रुग्णवाहिकेतून त्या मतदानासाठी आल्या होत्या. पक्षाला आवश्यकता असल्याने त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचं  निधन म्हणजे पक्षाची मोठी हानी आहे," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी शोक व्यक्त केला आहे. 

कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

टिळकांची पणतसून म्हणून 1992 मध्ये मुक्ता टिळक यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर त्या 17 वर्ष नगरसेवक होत्या. अडीच वर्ष त्या पुण्याच्या महापौर होत्या. त्यानंतर 2019 मध्ये कसबा मतदारसंघातून त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. अनेक वर्षांची मोठी राजकीय कारकीर्द असल्याने त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या नेत्यांसह, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील गर्दी केली होती. 

कुटुंब आणि राजकीय नेते उपस्थित

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी शैलेश टिळक, कुणाल टिळक, श्रुतिका टिळक, चैत्राली टिळक-भागवत, हर्षद भागवत, रोहित टिळक, दीपक टिळक, प्रणिती टिळक उपस्थित होते. त्यासोबतच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार प्रवीण दरेकर, माधुरी मिसाळ, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
Pune Rain : पुणे जिल्ह्यात मुसळधार! खडकवासलासह तीन धरणं भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे जिल्ह्यात मुसळधार! खडकवासलासह तीन धरणं भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Ujani Helicopter Fish : घरातील फिशटँकमधील माशाने डोकेदुखी वाढवली, जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोक्याची घंटा, उजनी परिसर टेन्शनमध्ये!
घरातील फिशटँकमधील माशाने डोकेदुखी वाढवली, जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोक्याची घंटा, उजनी परिसर टेन्शनमध्ये!
Khadakwasla Dam Water Discharge : पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून आज 43,571 क्युसेक्सने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून आज 43,571 क्युसेक्सने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
Embed widget