एक्स्प्लोर

Bhigwan Kidnapping Case: 'तर मग बाजारातून तिला पळवायची काय गरज होती?', भिगवण अपहरण प्रकरणावर गोपीचंद पडळकरांची मोठी मागणी, म्हणाले 'चोऱ्यामाऱ्या...'

Bhigwan Kidnapping Case: गोपीचंद पडळकर यांनी संताप व्यक्त करत या घटनेमागे कोण आहे, याचा तपास करून मुलीला तिच्या घरच्यांच्या ताब्यात द्यावं अशी मागणी एबीपी माझाशी बोलताना केली आहे.

भिगवण : आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत असताना २१ वर्षीय तरुणीचे भरदिवसा थरारक अपहरण झाल्याची घटना मंगळवारी (दि. १७) दुपारी चारच्या सुमारास घडली. तरुणीच्या आईला व भावाला दांडक्याने मारहाण करीत डोळ्यांत मिरचीपूड टाकून दोन सख्ख्या भावांनी तरुणीला जबरदस्तीने (Bhigwan Kidnapping Case) टेम्पोमध्ये कोंबून नेले, अशी फिर्याद तरूणीच्या आईने आणि भावाने दिली होती. या प्रकरणी आरोपी जहीर हरून शेख व आयान हरून शेख (रा. शेखवस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) यांच्यावर भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या घटनेबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. मुलीने मी माझ्या मर्जीने गेली असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे, तर त्याउलट तिच्या नातेवाईकांनी मुलगी स्वतःहून गेली नाही तर तिला पळवून नेलं असल्याचा दावा केला आहे, तर तिच्या मामाने मुलगी आमच्यासोबत आली नाही तर मी पोलिस स्टेशनच्या समोर आत्महत्या करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. याप्रकरणी भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी संताप व्यक्त करत या घटनेमागे कोण आहे, याचा तपास करून मुलीला तिच्या घरच्यांच्या ताब्यात द्यावं अशी मागणी एबीपी माझाशी बोलताना केली आहे.(Gopichand Padalkar Big demand on Bhigwan Kidnapping Case)

तर मग बाजारातून तिला पळवायची काय गरज होती

या घटनेवरती बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, हे बघा त्या मुलीच्या भावाचं आणि आईचं म्हणणं आहे की डोळ्यात चटणी टाकूनच या मुलीला पळवला आहे. जर यांचे प्रेम संबंध होते त्यांच्या घराला लागून घर आहे, तर मग बाजारातून तिला पळवायची काय गरज होती, रोज 24 तास एकाच ठिकाणी आहेत ना ते, एकाच गावातील आहेत, शेजारी शेजारी राहत आहेत, तर या प्रकरणाला वेगळे वळण दिलं जाते, तर पोलीस प्रशासनाला माझं आवाहन आहे, विनंती आहे की, याच्या मुळामध्ये जाऊन या प्रकरणाच्या पाठीमागे कोण आहे, यांना सपोर्ट कोण करते, त्याच्या मागे कोणाची शक्ती आहे, हे सर्व तपासून त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत, आणि मुलीला आई बापाच्या ताब्यात दिले पाहिजे, हीच आमची मागणी आहे, असेही पुढे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. 

मुळापर्यंत पोलिसांनी जावं हीच आमची मागणी 

काल परवा जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा पोराच्या डोक्यावर चटणी होती, जेव्हा पंचनामा पोलिसांनी केला, तेव्हा तिथे चटणी आढळून आली होती, ती काय घरातून घेऊन गेले का? त्यांना थोडीच माहित होती की असं काही घडणार आहे, हा जो बनाव आहे, या प्रकरणाला वेगळं वळन देण्याचा प्रयत्न सुरू आहे, ते करू नये आणि जो कोणी हा प्रयत्न करतोय, त्याच्या मुळापर्यंत पोलिसांनी जावं हीच आमची मागणी आहे आणि मुलगी कसल्याही परिस्थितीत आईच्या आणि भावाच्या ताब्यात दिली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. तिचं लग्न 22 तारखेला होतं, तो जो अझरजर आहे, तो अशा मुलांना पुढे करतो, त्याचे दोन नंबरचे पैसे तो देतो, मुलांना पुरवतो, ज्या मुलींना वडील नाहीत अशा मुलींना टार्गेट केलं जात आहे, 25 मुलींची प्रकरणे इंदापूर तालुक्यात घडले आहेत, ही काही साधी बाब नाही, ही अतिशय सिरीयस गोष्ट आहे. त्या मुलीचा स्टेटमेंट पाठवणं, अमुक कर, नाहीतर मग दबाव टाकणं हे जे सगळं चालू आहे, ते सगळं थांबवावं, आणि मुलीला तिच्या आईच्या ताब्यात द्यावं आणि मुलांना अटक करावं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांच्यामागे कोण आहे याचा तपास करावा, अशी ही मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

 तेव्हा तिथे ती चटणी दिसली होती

पोलिसांनी जेव्हा पंचनामा केला तेव्हा तिथे ती चटणी दिसली होती, परवा जेव्हा आम्ही गेलो तेव्हा सगळे लोक सांगत होते की ,पंचनामा केला तेव्हा तिथे चटणी घटनास्थळी होती, भर बाजारात हे झालेलं आहे, असं कुठे काय रानात झाले, अशातला भाग नाही. त्यांच्या एवढ्या जवळचे संबंध होते. तर बाजारातून जायची काय गरज आहे, तुम्ही रोज तिथेच राहता, जायचं आहे त्याला काय दोन मिनिटांचं कारणही पुरेसं होतं, परंतु याला जरा दबाव टाकून काहीतरी वेगळं वळण दिलं जात आहे, तर त्याच्यामुळाशी पोलिसांनी जावं, पोलीस प्रशासन चांगलं सहकार्य करत आहे, मी पुणे पोलिसांच्या आभार व्यक्त करतो, परंतु मुलगी जोपर्यंतच तिच्या घरच्यांच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत हे प्रकरण त्यांनी लावून धरावं अशी ही मी मागणी करतो आहे, असंही पडळकर म्हणालेत.

मुलीच्या नावावरती देखील प्रॉपर्टी आहे

ती मुलगी कसली परिस्थिती तिच्या घरच्यांच्या ताब्यात दिली गेली. त्या पोरावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याच्या बाजूने कोण आहे. अजहर आहे. त्याच्यावरची गुन्हा दाखल केला पाहिजे, त्याला कोणाचं पाठबळ आहे, तेही कळायला पाहिजे, तो कशाच्या मस्तीमध्ये हे सगळं करतोय, हे कळलं पाहिजे, अशी अनेक प्रकरणे आहेत. मागं एका हत्येच्या प्रकरणात स्वतः अजहर आरोपी होता, तलाठ्याला मारहाण कर, त्याच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न करणं, वाळूच्या केसेस, अशा बारा ते तेरा केस त्याच्यावरती आहे. तर हा जो गुन्हेगार आहे. तो सगळ्या मुलांना सपोर्ट करून ज्या मुलींना वडील नाहीत अशा मुलींना लक्ष केलं जाते किंवा ज्यांच्या नावावरती प्रॉपर्टी आहे,  मला कळते की या मुलीच्या नावावरती देखील प्रॉपर्टी आहे, अशा मुलींना टार्गेट करून किंवा काही विवाहित महिला आहेत त्यांना टार्गेट करायचे, त्यांच्या वेगवेगळ्या व्हिडिओ तयार करायचे, परत त्यांना ब्लॅकमेल करायचे, असे घाणेरडे प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, असंही पुढे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

हा पोरगा चोरटा आहे

वडील नसल्यामुळे त्या मुलीला टार्गेट केलेलं आहे. ती मुलगी शिकलेली सवरलेली आहे. डी फार्मसी शिकलेली मुलगी आहे आणि तील स्थळ आलं होतं तो मुलगा एमपीएससी एक्झाम पास झालेला मुलगा आहे असं सगळं चांगलं चाललेलं असताना, हा पोरगा चोरटा आहे, याच्यावरती चोरीच्या केसेस आहेत, हा चोऱ्यामाऱ्या करतो, मोटारी चोर असले उद्योग तो करतो, आता त्या मुलीला समजावून सांगितलं पाहिजे, पोलीस प्रशासनाने ते करावं असेही त्यांनी म्हटलं आहे. 

अधिकृत माहिती मिळाल्यानंतर मी नावासहित सर्व माहिती सांगेन 

कुटुंबांशी माझं बोलणं सुरू आहे, त्याचा काही विषय नाही, मुलगी पोलिसांच्या ताब्यात आहे, पुण्याचे एसपी संदीप गिल हे स्वतः आता बारामती मध्ये आलेले आहेत, ॲडिशनल एसपी तिथे आहे, डीवायएसपी तिथे आहेत, सगळे या प्रकरणात लक्ष घालून आहेत, मला आता सकाळी समजलं की, शेख नावाचा कोणीतरी अधिकारी आहे, आता मी अधिकृत माहिती घेत आहे, तो या सगळ्या प्रकरणांमध्ये सर्व मदत करतोय, असं मला आत्ता काही अधिकाऱ्यांच्याकडून कळलं आहे, अधिकृत माहिती मिळाल्यानंतर मी नावासहित सर्व माहिती सांगेन असेही पुढे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
Embed widget