Kirit Somaiya : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे आज पुणे (Pune) दौऱ्यावर असणार आहेत. आज ते पुण्यातील शिवाजी नगर पोलीस स्टेशन (Shivajinagar Police ), पुणे महानगरपालिका आणि संचिती हॉस्पिटल या ठिकाणांना भेट देणार आहेत. 


सकाळी 9.40- वाजत ते पुणे दौऱ्यासाठी दिल्लीमधून निघतील. 11 वाजून 30 मिनीटांनी ते पुण्यात पोहचणार आहेत. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या  आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये पुण्यात धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची देखील भेट घेतली होती. राज्यपालांनी पुण्यातील घटनेसंदर्भात चिंता व्यक्त केली असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटले  होतं. आता पुन्हा किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. 



राज्यपालांची भेटल घेतल्यानंतर  किरीट सोमय्या म्हणाले होते , 'पुण्यातील घटनेसंदर्भात  राज्यपालांनी चिंता व्यक्त केली.  ते या सगळ्या प्रकरणी राज्य सरकारकडे रिपोर्ट मागवणार आहेत. ते गृहमंत्र्यांशी देखील बोलणार आहेत.' तसेच  हल्ला करणाऱ्या एकूण 64 जण असून या 64 जणांना अटक करावी,  असं किरीट सोमय्या यांनी त्यावेळी म्हटलं होतं.  'मोदी सरकारच्या कमांडोमुळं मी वाचलो, उद्धव ठाकरेंनी कितीही उद्धटपणा केला, संजय राऊतांनी कितीही धमक्या दिल्या तरी मी भ्रष्टाचार बाहेर काढत राहणार', असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha