एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यात मनसे नगरसेवक धंगेकरांच्या प्रवेशाला भाजपचा विरोध
पुणे : पुण्यातील मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर भाजपच्या वाटेवर असून तो मनसेला मोठा धक्का मानला जातोय. मात्र धंगेकरांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही, यावरून भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे.
रविंद्र धंगेकर हे मनसेचे जेष्ठ नगरसेवक असुन ते पक्षाचे पालिकेतील गटनेते राहीलेले आहेत. त्याचबरोबर गिरीश बापटांच्या विरोधात त्यांनी दोन वेळा कसबा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूकही लढवली आहे.
नगरसेवकपदाचा त्यांचा प्रभाग भाजपचे पालिकेतील विद्यमान गटनेते गणेश बिडकर यांच्या प्रभागाशी जोडला गेलाय. त्यामुळे स्थानिक पातळीवर धंगेकर हे बापट आणि बिडकर यांचे विरोधक आहेत. असं असताना भाजपचे खासदार संजय काकडे यांनी धंगेकरांना भाजपमधे प्रवेश देण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. मात्र बापट आणि बिडकरांनी धंगेकरांच्या पक्षप्रवेशाला विरोध केलाय.
धंगेकरांना याबाबत फोनवरून विचारणा केली असता त्यांनी आपलं अजून काही ठरलेलं नाही अस म्हटलं आहे.
बापट - बिडकर गटाने धंगेकरांच्या पक्षप्रवेशाची आधीच वाच्यता करून काकडेंवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर खासदार काकडे यांनी आपण आज पुण्यात नसल्याने याबाबत उद्या पुण्यात पोहचल्यावर आपली भूमिका मांडू असं 'माझा'शी बोलताना म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
ठाणे
जॅाब माझा
जळगाव
Advertisement