पुणे: पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांनी पहाटे एक कोटी पाच लाख रूपयांचा अवैध गुटखा ट्रक सह जप्त करण्यात आला आहे. रविवारी पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड शिवापूर टोल नाक्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ट्रकसह 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ट्रक क्रमांक एम. एच. 05 डी. के. 8167 या वाहनात विमल पानमसाल्याच्या 202 पोत्यांचा समावेश असून त्याची अंदाजे किंमत तब्बल एक कोटी 5 लाख रुपये असल्याचे प्राथमिक अंदाजावरून सांगण्यात आलं आहे.


राजगड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, साताऱ्याहून पुण्याकडे जाणारा एक ट्रक खेड शिवापूर टोल नाक्यावर पहाटे आला. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली आहे.रविवारी पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड शिवापूर टोल नाक्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ट्रकसह 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 


पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटींचे पकडलं सोनं


पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत 138 कोटींचे सोने पकडले गेले होते. दोन दिवसांपुर्वी ही कारवाई करण्यात आली होती. सातारा रस्त्यावर नाकाबंदी पोलिसांनी कोट्यवधीचे सोने जप्त केले होते. एका संशयित वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात हे सर्व सोन्याचे दागिने सापडले. हे सोनं नेमकं कुठून आलं, कुठे जात होतं? कोणाचं होतं याचा तपास आता पोलीस करत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे 138 कोटी रुपये किंमत असलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, डिलिव्हरी ट्रान्सपोर्टची असण्याची शक्यता वर्तवली जात होती.


भुलेश्वरमधून 1 कोटी 32 लाखांची रोकड जप्त


मुंबईच्या भुलेश्वरमधून 1 कोटी 32 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या  प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. ही रक्कम नेमकी कोणाची आहे. याबाबतचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. यापूर्वी पुण्यात रोकड नेण्यासाठी आरोपींकडून कारचा वापर करण्यात येत होता. आता मात्र, पाच लोक संशयितरित्या बॅग घेऊन जात होते. 


पुणे खेड शिवापूर 5 कोटींच्या रोकड


खेड-शिवापूर टोलनाक्यावर सोमवारी रात्री एका वाहनातून 5 कोटी रुपयांची रक्कम हस्तगत केली. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांना ज्या गाडीत 5 कोटी रुपयांची रक्कम सापडली, ती गाडी सांगोल्यातील अमोल नलावडे याच्या नावावर असल्याची माहिती समोर आली. अमोल नलावडे हा एका मोठ्या नेत्याच्या जवळचा असल्याचा दावाही काही जणांनी केला. याचदरम्यान ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर आरोप केला होता.