मोठी बातमी! राज्य मागासवर्ग आयोगाच्या आणखी एका सदस्याने दिला राजीनामा
State Backward Classes Commission : आयोगाच्या बैठकीत माझ्या आणि आयोगाच्या वैचारिक मतभेदांमुळे व्यथित होऊन आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे
पुणे : राज्य मागासवर्ग आयोगात (State Backward Classes Commission) राजीनामा सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आज पुन्हा सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चार दिवसात हा दुसरा राजीनामा आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य असलेले लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी बबनराव तायवाडे (Babanrao Taiwade), संजय सोनवणे (Sanjay Sonwane), बी. एल. किल्लारीकर (B. L. Killarikar) आणि आता लक्ष्मण हाके यांनी मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. आयोगाच्या बैठकीत माझ्या आणि आयोगाच्या वैचारिक मतभेदांमुळे व्यथित होऊन आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकीकडे राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय होत असतानाच दुसरीकडे मात्र आयोगाच्या सदस्यांचे राजीनामा सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. (Laxman Hake resigning member of the State Backward Classes Commission)
मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, अशात राज्य सरकारकडून आता मागासवर्ग आयोगाला देखील मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले आहे. असे असताना राज्य मागासवर्ग आयोगात राजीनामा सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांत एकूण 4 सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अशातच आज लक्ष्मण हाके यांनी देखील मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी बबनराव तायवाडे, संजय सोनवणे, बी. एल. किल्लारीकर आणि आता लक्ष्मण हाके यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.
राजीनामा पत्रात काय म्हटले आहे?
"मी, लक्ष्मण सोपान हाके, सदस्य महाराब्ट्र राज्य मागासवर्ग आयोग या पदावर जून 2022 कार्यरत असून, 1 डिसेंबर 2023 रोजी आयोगाच्या बैठकीमधील माझ्या व आयोगाच्या वैचारिक मतभेदामुळे व्याथित होवून, आज दिनांक 02 डिसेंबर 2023 रोजी माझ्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे."
जय हिंद जय महाराष्ट्र
चार दिवसात दुसरा राजीनामा...
आरक्षणाचा मुदा मार्गी लावण्यासाठी मागासवर्ग आयोगाला मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले आहे. असे असतांना दुसरीकडे मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांमध्ये एकमत नसल्याचे समोर येत आहे. कारण गेल्या चार दिवसांत 2 सदस्यांनी मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचे राजीनामे दिले आहे. बी. एल. किल्लारीकर आणि आता लक्ष्मण हाके यांनी मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
काल राजीनामा दिला, आज शरद पवारांच्या भेटीला; मराठा आरक्षणावरून मागासवर्ग आयोगात मतभेद?