Ginger Farm :  बारामती तालुक्यातील निंबुत (Ginger) येथील शेतकरी संभाजीराव काकडे यांनी आपल्या शेतात आल्याचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. काकडे यांनी पावणे दोन एकर शेतात आल्याची लागवड केली होती. पहिल्या वर्षी त्यांना टनाला केवळ 10 हजारांचा भाव मिळाला. त्यामुळे पाहिलं वर्ष त्यांना तोट्यात गेले. मात्र तरी देखील त्यांनी हार न मानता पुन्हा पावने दोन एकर क्षेत्रात आल्याची लाडवड केली. या वर्षी मात्र त्यांना आल्याने चांगली साथ दिली. यावर्षी त्यांच्या आल्याला जागेवरच 66 हजार प्रतिटन भाव मिळाला आहे. त्यामुळे त्यांना यावर्षी आल्याच्या शेतातून फायदा झाला आहे. 


आल्याचं पीक सातारा, कोरेगाव, सांगली या भागांत घेतले जाते. काकडे यांनी प्रयोग म्हणून हे पीक घेतले. पावणेदोन एकर आल्यातून 28 टन माल निघाला. 66 हजार रुपये टन प्रमाणे 18 लाख 50 हजर रुपये उत्पन्न मिळाले. त्यामुळे उसाच्या मागे धावण्या पेक्षा आल्याचे उत्पादन घेण्यात त्यांना यश आले आहे. काकडे यांना पावणे दोन एकरावर 4 लाख हजार खर्च वजा जाता काकडे यांना जवळपास 14 लाख 50 रुपये उत्पन्न मिळाले आहे.


संभाजी काकडे सांगतात की, मागील दोन वर्षांपासून मी या परिसरात आल्याचं पिक घ्यायला सुरुवात केली होती. बारामती तालुक्यातील निंबुत या गावाच्या परिसरात साधारण आल्याचं पिक घेतलं जात नाही. मात्र आम्ही आल्याचं पिक घेण्याचा निर्णय घेतला. प्रयोग करुन बघायचं ठरवलं. पहिल्या वर्षी आमचं पिक तोट्यात गेलं. साधारण एक टनाला 10 ते 12 हजार रुपये अशी किंमत मिळाली. मात्र यावर्षी आल्याच्या पिकाला चांगला भाव आहे. त्यामुळे आमचा हा प्रयोग यशस्वी झाला. 


...तर तरुण वर्ग शेतीत नवे प्रयोग करतील!


सरकारने शेतकऱ्यांना हमी भाव दिला तर त्याचे अनेक फायदे शेतकऱ्यांना होतील. शेतकरी शेतीपासून दूरही जाणार नाही. हमी भाव नसल्याने शेतकरी शेतीपासून दूर जाताना दिसत आहेत. त्यासोबतच हमी भाव दिल्यानंतर शेतात काम करणाऱ्या मजूरांनादेखील जास्त पैसे देता येईल. यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे, तरुण वर्ग शेती करण्यासाठी तयार नाहीत. ते नोकरीच्या शोधात शहरात जात आहेत. योग्य भाव मिळाला तर तरुणही शेतात नवे प्रयोग करण्याचा प्रयत्न करतील असे ते म्हणाले. व्यापाऱ्यांनी योग्य भाव देऊन शेतीतूनच माल घेतला तर अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचंही ते म्हणाले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Marathwada Unseasonal Rain : मराठवाड्यात अवकाळीचा तडाखा, वीज पडून चौघांचा मृत्यू; लहान-मोठी 54 जनावरेही दगावली