बारामती, पुणे : मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची (Sunetra Pawar) भेट बारामतीत जाऊन भेट घेतली आहे. सुनेत्रा पवार यांची उमेदवारी  (Baramti Loksabha Constituency) आता निश्चित मानली जात आहे. मात्र त्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी सुनेत्रा पवारांशी पाऊण तास चर्चा झाली आहे. काहीच दिवसांपूर्वी बारामतील अजित पवार गटाची जागा सुनेत्रा पवार यांना दिली आहे. याची वेगळी घोषणा करण्याची गरज नाही आहे, असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलं होतं. त्यानंतर सुनेत्रा पवार प्रचारासाठी बाहेर पडण्याआधी आम्ही एकत्र चहा घेतल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. त्यामुळे आता बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यात तगडी लढत होण्याची शक्यता आहे आता सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार कशी कडवी झुंज देणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.


चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले. 


सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले ती, कालच निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक घोषित केलं.आजपासून सगळ्या राजकीय पक्षांच्य गतविधीला जोर येणार आहे.   भाजपने ठरवलं आहे की आपण पुढाकार घेऊन सगळ्या पक्षांचा समन्वय राखला गेला पाहिजे. यामुळे 48च्या 48 जागा जिंकणं अवघड राहणार नाही. माझ्याकडे तीन लोकसभा मतदार संघाचा समोर बारामती शिरूर आणि पुण्याची जबाबदारी आहे विधानसभांचा 50 जणांचा क्लस्टर अशी एकूण 300 जणांची बारामतीत बैठक आहे. या बैठकीत काय बोलायचं आणि काय बोलू नये, यासंदर्भात चर्चा होणार आहे. मात्र त्यापूर्वी सुनेत्रा पवार प्रचारासाठी बाहेर पडण्याआधी आम्ही एकत्र चहा घेतला, असंही त्यांनी सांगितलं. शिवाय या भेटीवरुन न कळत चंद्रकांत पाटलांनी सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिल्याचं दिसत आहे. 


सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार कशी कडवी झुंज देणार?


राज्याचं लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभेची महायुतीची जागा आता निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. सुनेत्रा पवारच या बारामतीतून लढणार असल्याचं दिसत आहे. सुनेत्रा पवार आणि अजित पवार ही जागा जिंकून आणण्यासाठी जंग जंग पछाडताना दिसत आहेत. रोज सभा आणि भेटी गाठी सुरु आहे. तिकडे सुप्रिया सुळेंसाठी अख्ख पवार कुटुंब प्रचाराला लागल्याचं दिसत आहे. सुप्रिया सुळेंसाठी वडिल शरद पवार, सुनंदा पवार , सई पवार,रोहित पवार हे सगळे एकत्र आले आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवारांसठी या सगळ्यांना तोंड देऊन जागा खेचून आणण्याचं मोठं आव्हान आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Adhalrao Patil : शिवाजीराव आढळराव पाटील बाण सोडून नव्या वेळेचं घड्याळ हातात बांधणार! मुहूर्तही ठरला...